योगेश्वर पुरूषोत्तम गीता अभ्यास मंडळ ट्रस्ट यांचा 19 वा वर्धापन दिन साजरा - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Thursday, 7 March 2019

योगेश्वर पुरूषोत्तम गीता अभ्यास मंडळ ट्रस्ट यांचा 19 वा वर्धापन दिन साजरा

Pandharpur LIVE 7 March 2019

पंढरपूर - येथील योगेश्वर पुरूषोत्तम गीता अभ्यास मंडळ ट्रस्ट यांचा 19 वा वर्धापन दिन जाधवजी जेठाभाई धर्मशाळा येथे साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष दिलीप वासुदेव आपटे (गीता फाऊंडेशन मिरज) हे होते. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.सौ.राधा मोहन गोडबोले (गीता धर्म मंडळ पुणे) हे होते.
वर्धापन दिनाचे औचित्य साधून राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन केले होते त्याचे पारितोषिक वितरण करण्यात आले. यामध्ये प्रथम क्रमांक 1500 रूपये, द्वितीय क्रमांक 1000 रूपये, तृतीय क्रमांक 700 रूपये व उत्तेजनार्थ 500 रूपये ही चार बक्षिसे देण्यात आली. पुढील वर्षाचा विषय महाभारतातील युध्द : व्यक्ती युध्द की वृत्ती युध्द हा असणार आहे.

प्रमुख पाहुण्या डॉ.सौ.राधा मोहन गोडबोले  यांनी गीतेतील निवडक श्लोकांवर प्रकाश टाकला. यामध्ये माणसाने जगण्यामध्ये कांही अडचणी आल्या त्याचे निरसन कसे करावे व योग्य मार्गाने कसे जगावे व जगवावे. जीवनातले वैफल्य सोडून सात हजार वर्षापूर्वी श्रीकृष्णाने अर्जुनाला केलेला उपदेश तो आपल्याला कसा लागू पडतो व आपले जीवन त्या पध्दतीने जगल्यास वैफल्य, नैराश्य, आत्महत्येचे प्रयत्न घडू शकणार नाहीत. गीतेचे शिक्षण माणूसकीचे रक्षण, गीतेचे आचरण चारित्र्याचे घडण कसे होईल यावर ही प्रकाश टाकला.


📲पंढरपूर लाईव्ह वरील ताज्या बातम्या पहाण्यासाठी खालील लिंकला क्लीक करुन आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करा, पंढरपूर लाईव्ह चे अँड्रॉईड अॅप्लीकेशन.

➡️पंढरपूर लाईव्ह वर आपल्या बातम्या व जाहिराती देण्यासाठी संपर्क साधा- 7972287368, 7083980165कार्यालय- शिवयोगी मंगल भवन, कर्मयोगी नगर, लिंक रोड, पंढरपूरMail- livepandharpur@gmail.com 
अध्यक्षीय भाषणात दिलीप आपटे यांनी मार्गदर्शन करताना गीतेचे महत्व काय आहे व त्याचे शालेय शिक्षण का महत्वाचे आहे व गीतेचे शाळेमध्ये अभ्यासक्रम लागू करावा त्यासाठी मी पूर्णपणे सहकार्य करणार आहे यावरही प्रकाश टाकला व गीतेचे महत्व पटवून दिले व नवीन पिढीसाठी ही संस्कार घडविण्यासाठी काळाची गरज बनली आहे.
कार्यक्रमाचे स्वागत मिलिंद अढवळकर यांनी केले. प्रास्ताविक द.सी.जोशी सर यांनी केले. संकल्प वाचन सौ.छाया अढवळकर यांनी केले. पाहुण्यांचा परिचय चंद्रशेखर जोशी, सौ.शोभाताई कुलकर्णी यांनी केला. अहवाल वाचन सौ.अलका पुजारी यांनी केले. पाहुण्यांचे मनोगत डॉ.सौ.राधा गोडबोले यांनी केले.  सुत्रसंचालन सौ.शिल्पा चौंडावार यांनी केले तर उपस्थितांचे आभार जोशी सर यांनी मानले. या कार्यक्रमासाठी ट्रस्टचे अध्यक्ष डॉ.गोपाळराव गुणे, दामोदरे सर, सौ.शुभदा गुणे, सौ.पत्की, सौ.अंधळगावकर, प्रा.अशोक डोळ सर, समाधान रोकडे उपस्थित होते.
पसायदान पठण करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.


add