पंढरपूर सिंहगडच्या विद्युत विभागात क्विज अँड पझल आणि पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धा

Pandharpur LIVE 7 March 2019

सिंहगड मधील विद्युत अभियांत्रिकी च्या स्पर्धेचे उदघाटन करताना 
डाॅ.शंकर नवलेडाॅ. कैलाश करांडे सोबत शिक्षक.

पंढरपूर (प्रतिनिधी) कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस. के. एन. सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयातील विद्युत अभियांत्रिकी विभागात क्विज अँड पझल आणि पोस्टर प्रेझेंटेशन या राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होती. ही स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाली असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.


📲पंढरपूर लाईव्ह वरील ताज्या बातम्या पहाण्यासाठी खालील लिंकला क्लीक करुन आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करा, पंढरपूर लाईव्ह चे अँड्रॉईड अॅप्लीकेशन.

➡️पंढरपूर लाईव्ह वर आपल्या बातम्या व जाहिराती देण्यासाठी संपर्क साधा- 7972287368, 7083980165कार्यालय- शिवयोगी मंगल भवन, कर्मयोगी नगर, लिंक रोड, पंढरपूरMail- livepandharpur@gmail.com 

या स्पर्धेचे उदघाटन सोलापूर सिंहगड चे प्राचार्य डॉ. शंकर नवलेपंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडेविद्युत विभाग प्रमुख प्रा.श्रीनिवास गंजेवार ,प्रा. गणेश लकडे यांच्या हस्ते सरस्वती पूजन करून दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
   विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयातील इलेक्ट्रीकल इंजिनिअरींग विभागात स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत विविध महाविद्यालयातील 200 हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्युत विभागातील प्रा. चंदूलाल. प्रा.लोकेश स्वामीप्रा.अंजली चांदणे सह विभागातील विद्यार्थीशिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचा-यांनी परिश्रम घेतले.