सुजात आंबेडकर उद्या पंढरपुरात

Pandharpur LIVE 22 March 2019


डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू आणि ऍड. बाळासाहेब तथा प्रकाश  आंबेडकर यांचे पुत्र आयु. सुजात आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली उद्या शनिवार, दिनांक 23/03/2019, रोजी सायं. 5.00 वाजता फरताळे महाराज मठ, उंच विठोबा शेजारी, भक्ती मार्ग, पंढरपूर येथे वंचित बहुजन आघाडीची सोलापूर लोकसभा मतदारसंघ नियोजन बैठक  आयोजित केली आहे. बैठकीच्या अध्यक्षस्थानी वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष सुनिल वाघमारे असतील.

बैठकीत पंढरपूर परिसरातील बुथ बांधणी संदर्भात मार्गदर्शन केले जाणार आहे. यावेळी अ.भा.माळी महासंघाचे अध्यक्ष शंकर लिंगे, राजकीय विश्लेषक प्रा. धैर्यशील भंडारे, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रा. धम्मपाल माशाळकर, भारिपचे जिल्हाध्यक्ष निशांत बनसोडे, माढा विभाग जिल्हाध्यक्ष दशरथ अण्णा कांबळे, युवा जिल्हाध्यक्ष सागर गायकवाड, जिल्हा कार्यकारिणी सदस्य सेवागिरी गोसावी, बि. आर. भोसले, तालुकाध्यक्ष ऍड. सुरेश कांबळे, वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष मल्हारी बनसोडे, भारिपचे मंगळवेढा तालुकाध्यक्ष लक्ष्मण गायकवाड, वंचित बहुजन आघाडीचे मंगळवेढा तालुकाध्यक्ष महादेव ढोणे, भारिपचे शहराध्यक्ष प्रकाश दुपारगुडे, उपस्थित असतील.
कार्यकर्त्यांनी वेळेत उपस्थित रहावे असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष योगेश मोर यांनी केले आहे.📲 पंढरपूर लाईव्ह वरील ताज्या बातम्या पहाण्यासाठी खालील लिंकला क्लीक करुन आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करा, पंढरपूर लाईव्ह चे अँड्रॉईड अॅप्लीकेशन. https://play.google.com/store/apps/details…
➡️ पंढरपूर लाईव्ह वर आपल्या बातम्या व जाहिराती देण्यासाठी संपर्क साधा- 7972287368, 7083980165 कार्यालय- शिवयोगी मंगल भवन, कर्मयोगी नगर, लिंक रोड, पंढरपूर Mail- livepandharpur@gmail.com