स्वच्छ, निर्भय, पारदर्शक निवडणूक प्रक्रियेसाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाची सक्रीय भूमिका महत्त्वाची-- अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे

Pandharpur LIVE 7 March 2019


            मुंबईदि. 6 : यावर्षीच्या लोकसभा निवडणुकांमध्ये अनेक नाविन्यपूर्ण बाबींचा समावेश असणार असून माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने या नवीन बाबींचा अंगीकार करून स्वच्छनिर्भयमुक्त आणि पारदर्शी वातावरणात निवडणुका पार पडण्यात सक्रीय भूमिका बजावावीअसे आवाहन अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी आज येथे केले.
            माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्यावतीने आयोजित राज्यातील सर्व जिल्हा माहिती अधिकाऱ्यांच्या निवडणूकविषयक कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी श्री. शिंदे बोलत होते.
            जिल्हा माहिती अधिकारी हे माध्यम प्रमाणीकरण आणि सनियंत्रण समितीचा (मीडिया सर्टिफिकेशन अँड मॉनिटरिंग कमिटी-एमसीएमसी) महत्त्वाचा घटक असून या समितीमार्फत उमेदवारांच्या इलेक्ट्रॉनिक माध्यमांवर देण्यात येणाऱ्या जाहिराती प्रमाणित करणेवृत्तपत्रातून प्रसिद्ध होणाऱ्या निवडणूकविषयक वृत्ताची कात्रणे काढून आयोगाबाबत टिकाटिपण्णी असल्यास त्याबाबत खुलासा प्राप्त करून प्रसिद्धीची व्यवस्था करणे आदी कामे करावी लागतात. यावर्षी'एमसीएमसीला सोशल मीडियावर प्रसारित होणारे उमेदवाराचे प्रचारसाहित्यही प्रमाणित करायचे आहे. प्रत्येक निवडणुकीतील प्रभावी कामाची परंपरा माहिती व जनसंपर्क विभाग यापुढेही चालू ठेवीलअसा विश्वास श्री. शिंदे यांनी व्यक्त केला.


📲पंढरपूर लाईव्ह वरील ताज्या बातम्या पहाण्यासाठी खालील लिंकला क्लीक करुन आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करा, पंढरपूर लाईव्ह चे अँड्रॉईड अॅप्लीकेशन.

➡️पंढरपूर लाईव्ह वर आपल्या बातम्या व जाहिराती देण्यासाठी संपर्क साधा- 7972287368, 7083980165कार्यालय- शिवयोगी मंगल भवन, कर्मयोगी नगर, लिंक रोड, पंढरपूरMail- livepandharpur@gmail.com 

            श्री. शिंदे पुढे म्हणालेया निवडणुकीत संपूर्ण राज्यात व्हीव्हीपॅटचा वापरराज्यातील 10 टक्के मतदान केंद्रांचे वेबकास्टिंगद्वारे संगणकीय थेट प्रक्षेपणनागरिकांसाठी सीव्हिजील ॲप,दिव्यांगांसाठी पीडब्ल्यूडी ॲप आदी अनेक नाविन्यपूर्ण बाबी या निवडणुकीमध्ये असणार आहेत. व्हीव्हीपॅटमुळे मतदाराला आपले मत आपल्याच उमेदवाराला गेल्याची खात्री होणार आहे. वेबकास्टिंगमुळे त्या मतदान केंद्रांवरील सर्व हालचाली ऑनलाईन दिसणार आहेत. कोठे काही गैरप्रकार आढळल्यास तत्काळ पुढील कार्यवाही करता येणार आहे. सीव्हिजील ॲपद्वारे कोणीही नागरिक आचारसंहिता भंग किंवा इतर गैरव्यवहाराविषयी तक्रारछायाचित्रचित्रफीत अपलोड करु शकणार आहे. या ॲपमध्ये दाखल तक्रारीवर 100 मिनीटात कार्यवाही व्हावी अशी संगणकीकृत व्यवस्था निर्माण करण्यात आली आहे.


            ‘पीडब्ल्यूडी’ ॲपवर दिव्यांग मतदार नोंदणी करुन व्हीलचेअर आदी सुविधांची मागणी नोंदवू शकेल. व्हीव्हीपॅटवेबकास्टिंगनाविण्यपूर्ण बाबींविषयी मतदार जागृती तसेच वेळोवेळी आयोगाची भूमिका जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी माहिती व जनसंपर्क विभागाने प्रसिद्धीमाध्यमांबरोबर समन्वय साधून काम करावे. पेड न्यूज वर लक्ष ठेवण्याचे काम एमसीएमसी समितीने दक्ष राहून करावेअसे आवाहनही श्री. शिंदे यांनी यावेळी केले.
यावेळी महासंचालनालयाचे संचालक अजय अंबेकरसुरेश वांदिलेमाजी संचालक शिवाजी मानकरउपसंचालक गोविंद अहंकारीसीमा रनाळकरविभागीय उपसंचालक गणेश मुळेमोहन राठोडयशवंत भंडारेकिरण मोघे आदी उपस्थित होते.