पंढरपूर लाईव्हने सफाई कामगार महिला भगिणींचा केलेला सन्मान हाच खरा महिला दिन- नगराध्यक्षा सौ.साधनाताई भोसले - Pandharpur Live

Breaking

Post Top Ad

Friday, 8 March 2019

पंढरपूर लाईव्हने सफाई कामगार महिला भगिणींचा केलेला सन्मान हाच खरा महिला दिन- नगराध्यक्षा सौ.साधनाताई भोसले

Pandharpur LIVE 8 March 2019


पंढरपूर लाईव्ह कार्यालयात महिला दिन उत्साहात साजरा...

Video News


जागतिक महिला दिनाचे औचित्य साधुन पंढरपूर लाईव्हने आज जो पंढरपूर नगरपरिषद सफाई कामगार महिला भगिणींना सन्मान दिला, हाच खरा महिला दिन असल्याचे मनोगत नगराध्यक्षा सौ.साधनाताई भोसले यांनी व्यक्त केलं. आज दि. 8 मार्च 2019 रोजी पंढरपूर लाईव्हच्या कार्यालयात जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने पंढरपूर नगरपरिषदेच्या कांही सफाई कामगार महिला भगिणींचा सन्मान पंढरपूर लाईव्ह कार्यालयात करण्यात आला. 

नगराध्यक्षा सौ.साधनाताई नागेश भोसले यांच्या शुभहस्ते श्रीमती कल्पना सुनील वाघमारे, सौ.सुवर्णा गहिनीनाथ जाधव, श्रीमती शांताबाई उत्तम पाटोळे, सौ. आदिका संतोष ढवळे या सफाई कामगार महिला भगिणींना शाल, श्रीफळ व गुलाबपुष्प देऊन त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. यावेळी नगराध्यक्षा सौ.साधनाताई भोसले व सौ. सावंत ताई यांचाही सत्कार करण्यात आला. 

यावेळी सौ. सावंत ताई, पंढरपूर लाईव्हचे संपादक भगवान वानखेडे, समाजसेवक ओंकार बसवंती व प्रदिप पांढरे सर आदी उपस्थित होते. सर्व महिला भगिणींचे व नगराध्यक्षा सौ.साधनाताई भोसले यांचे संपादक भगवान वानखेडे यांनी आभार व्यक्त केले. 


📲पंढरपूर लाईव्ह वरील ताज्या बातम्या पहाण्यासाठी खालील लिंकला क्लीक करुन आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करा, पंढरपूर लाईव्ह चे अँड्रॉईड अॅप्लीकेशन.

➡️पंढरपूर लाईव्ह वर आपल्या बातम्या व जाहिराती देण्यासाठी संपर्क साधा- 7972287368, 7083980165कार्यालय- शिवयोगी मंगल भवन, कर्मयोगी नगर, लिंक रोड, पंढरपूरMail- livepandharpur@gmail.com No comments:

Post a Comment

Pages