लेखक अंकुश गाजरे यांना छत्रपती परिवाराचा साहित्य पुरस्कार जाहीर

Pandharpur LIVE 22 March 2019छत्रपती परिवार मरवडे ( ता. मंगळवेढा) यांच्यावतीने प्रत्येकवर्षी विविध पुरस्कार देऊन गौरविण्यात येत असते.यावर्षी शेळवे (ता.पंढरपूर) येथील युवा ग्रामीण साहित्यिक अंकुश गाजरे यांना मनाच्या  स्व. मुक्ताबाई आप्पा कुंभार साहित्य गौरव पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. अंकुश गाजरे यांच्या चर्चेत असलेल्या " गावमातीतली माणसं" या व्यक्तिचित्र संग्रहासाठी हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. सोमवार दिनांक २५ रोजी सायंकाळी ७ वाजता मरवडे येथे संत तुकाराम महाराज यांचे १० वे वंशज हभप शिवाजीराव मोरे  यांच्या शुभहस्ते सन्मानित करण्यात येणार आहे. स्मृतिचिन्ह ,मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

      लेखक अंकुश गाजरे यांची चार पुस्तके प्रकाशित आहेत.याअगोदर त्यांना साहित्य सेवेसाठी अनेक मोठ्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.पुरस्कार मिळाल्याबद्दल जेष्ठ लेखक डॉ.द.ता.भोसले सर, आमदार दत्तात्रय सावंत सर, राजेश पवार सर, कल्याणराव शिंदे सर, ज्योतिराम गायकवाड सर, कवी सुनील जवंजाळ, कवी गणेश गायकवाड , कवी हरिश्चंद्र पाटील आदींनी अभिनंदन केले आहे.📲 पंढरपूर लाईव्ह वरील ताज्या बातम्या पहाण्यासाठी खालील लिंकला क्लीक करुन आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करा, पंढरपूर लाईव्ह चे अँड्रॉईड अॅप्लीकेशन. https://play.google.com/store/apps/details…
➡️ पंढरपूर लाईव्ह वर आपल्या बातम्या व जाहिराती देण्यासाठी संपर्क साधा- 7972287368, 7083980165 कार्यालय- शिवयोगी मंगल भवन, कर्मयोगी नगर, लिंक रोड, पंढरपूर Mail- livepandharpur@gmail.com