विद्यार्थ्यामध्ये शिक्षणातूनच जीवनमूल्ये रुजविणे आणि कौशल्याचा विकास करणे आवश्यक - डॉ. लेसन आझादी

Pandharpur LIVE 7 March 2019


पंढरपूर: ‘ आपल्या क्षमता आपल्याला माहीत असणे आवश्यक आहे. प्रत्येकाला स्वतःला ओळखता आले पाहिजे. सांघिक काम करण्याने काम पूर्णत्वास जाते. प्रत्येकाची भूमिका महत्त्वाची आहे. आशयचे विश्लेषण
करताना व उदाहरणे देताना विद्यार्थ्याचे वय आणि बौद्धिक क्षमतेचा विचार केल्यास विद्यार्थी वर्गात गोंधळ करणार नाहीत. शिक्षकांनी विद्यार्थ्यांसमोर सकारात्मक विचार मांडावेत. तसेच आनंदाने आणि जबाबदारीने विद्यार्थ्यासमोर जाणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यामध्ये शिक्षणातूनच जीवनमूल्ये रुजविणे आणि कौशल्याचा विकास करणे आवश्यक आहे.’ असे विचार बहाई अकादमी, पाचगणीचे संचालक डॉ. लेसन आझादी यांनी मांडले. 

पंढरपूर येथील रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात ‘व्यावसायिक विकास’ या विषयावरील एक दिवसीय कार्यशाळेचे प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक भोईटे होते.


📲पंढरपूर लाईव्ह वरील ताज्या बातम्या पहाण्यासाठी खालील लिंकला क्लीक करुन आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करा, पंढरपूर लाईव्ह चे अँड्रॉईड अॅप्लीकेशन.

➡️पंढरपूर लाईव्ह वर आपल्या बातम्या व जाहिराती देण्यासाठी संपर्क साधा- 7972287368, 7083980165कार्यालय- शिवयोगी मंगल भवन, कर्मयोगी नगर, लिंक रोड, पंढरपूरMail- livepandharpur@gmail.com 
डॉ. सौ. शशिकला गायकवाड सहसंचालक बहाई अकादमी, पाचगणी यांनी मार्गदर्शन केले. डॉ. गायकवाड यांनी मेंडोलीन वाद्य वाजवून सर्वांना मंत्रमुग्द केले. यावेळी व्यासपीठावर उपप्राचार्य बी. जे. तोडकरी, प्रा. एन. एन. तंटक, प्रा. जी. बी. भगत आदी उपस्थित होते. स्वागत, प्रास्ताविक व पाहुण्याचा परिचय डॉ. समाधान माने यांनी करून दिला. तर सूत्रसंचालन डॉ. खतीब यांनी केले. आभार प्रा. जी. बी. भगत यांनी मानले. या प्रसंगी महाविद्यालयातील शिक्षक-शिक्षकेत्तर सेवक बहुसंख्येने उपस्थित होते.