माढ्याचा उमेदवार सर्वांशी चर्चेनंतर जाहीर होणार- जयंत पाटील - Pandharpur Live

Breaking

Post Top Ad

Saturday, 16 March 2019

माढ्याचा उमेदवार सर्वांशी चर्चेनंतर जाहीर होणार- जयंत पाटील

Pandharpur LIVE 16 March 2019


राष्ट्रवादी काँग्रेसने लोकसभा निवडणुकीसाठी आणखी पाच मतदारसंघातील उमेदवार जाहीर केले असून, एकाच कुटुंबातील अनेक उमेदवार असता कामा नये, असे सांगत शरद पवार यांनी माढा लोकसभा मतदारसंघात निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतल्याने सर्वांशी सल्लामसलत करून तेथील उमेदवार जाहीर केला जाईल, असे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शुक्रवारी सांगितले.

'मराठवाड्यातील बीड लोकसभा मतदारसंघात बजरंग सोनवणे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. दक्षिण अहमदनगर आणि अन्य लोकसभा मतदारसंघातील आणखी काही उमेदवारांची नावे लवकरच जाहीर केली जातील. काँग्रेस पक्षासोबत जागावाटपाची चर्चा सुरू आहे. एक दोन दिवसात इतर नावांची यादीही जाहीर केली जाईल', असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले. या पत्रकार परिषदेला राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक, पक्षाचे कोषाध्यक्ष आ. हेमंत टकले, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड, अनिल देशमुख, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे उपस्थित होते. 📲पंढरपूर लाईव्ह वरील ताज्या बातम्या पहाण्यासाठी खालील लिंकला क्लीक करुन आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करा, पंढरपूर लाईव्ह चे अँड्रॉईड अॅप्लीकेशन.

➡️पंढरपूर लाईव्ह वर आपल्या बातम्या व जाहिराती देण्यासाठी संपर्क साधा- 7972287368, 7083980165कार्यालय- शिवयोगी मंगल भवन, कर्मयोगी नगर, लिंक रोड, पंढरपूरMail- livepandharpur@gmail.com 


No comments:

Post a Comment

Pages