मातोश्री मिनाताई ठाकरे प्रतिष्ठानच्यावतीने महिला दिनानिमित्त महिलांचा सन्मान - Pandharpur Live

Breaking

Post Top Ad

Friday, 8 March 2019

मातोश्री मिनाताई ठाकरे प्रतिष्ठानच्यावतीने महिला दिनानिमित्त महिलांचा सन्मान

Pandharpur LIVE 8 March 2019


पंढरपूर । प्रतिनिधी,
मातोश्री मिनाताई ठाकरे प्रतिष्ठान पंढरपूर यांच्यावतीने दि.8 मार्च 2019 रोजी जागतिक महिला दिनानिमित्त महिलांचा सन्मान करून महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी प्रथम राष्ट्रमाता जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, राजमाता अहिल्यादेवी होळकर, माता रमाई आंबेडकर, तमाम शिवसैनिकांच्या माई मिनाताई ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवर महिलांचे हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ.शैलाताई अनिल सावंत होत्या. तर प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना जिल्हा महिला आघाडी प्रमुख तथा जिल्हा परिषद सदस्या सौ.शैलाताई गोडसे या होत्या.

यावेळी ओबीसी फाऊंडेशन पुरस्कारप्राप्त राजश्रीताई शंकर लोंढे व मनिषाताई सुरेश गायकवाड यांचा सत्कार शैलाताई सावंत व शैलाताई गोडसे यांच्याहस्ते करण्यात आला. यावेळी आरती बसवंती, संगीता पवार, चंचला बुराडे, अमृता बुराडे यांच्यासह आदि महिला उपस्थित होत्या. 


📲पंढरपूर लाईव्ह वरील ताज्या बातम्या पहाण्यासाठी खालील लिंकला क्लीक करुन आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करा, पंढरपूर लाईव्ह चे अँड्रॉईड अॅप्लीकेशन.

➡️पंढरपूर लाईव्ह वर आपल्या बातम्या व जाहिराती देण्यासाठी संपर्क साधा- 7972287368, 7083980165कार्यालय- शिवयोगी मंगल भवन, कर्मयोगी नगर, लिंक रोड, पंढरपूरMail- livepandharpur@gmail.com 
यावेळी राजश्रीताई  लोंढे, मनिषाताई गायकवाड, शैलाताई सावंत, शैलाताई गोडसे,रहेना भाभी आतार, अमृता बुराडे, स्वप्नाली घोडके यांनी आपली मनोगते व्यक्त करताना महिला दिनाच्या शुभेच्छा देऊन महिलांनी अबला नव्हे तर सबला बनून जगल पाहिजे व महिलांनी महिलांचे प्रश्न सोडविले पाहिजेत. सासू-सुनेतले भेदभाव संपवले पाहिजे असा संदेश या निमित्ताने देण्यात आला. सुत्रसंचालन साईश्री बुराडे हिने केले. 
यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय दशरथ घोडके, उप जिल्हा प्रमुख सुधीर अभंगराव, तालुका प्रमुख महावीर देशमुख,शहर समन्वय माऊली अष्टेकर, काकासाहेब बुराडे, अमित गायकवाड आदि उपस्थित होते.या कार्यक्रमासाठी अनिल सप्ताळ, महेश देवकर, आनंद घोडके, विजय जाधव, गौतम लेंडवे यांच्यासह आदिंनी परिश्रम घेतले.


No comments:

Post a Comment

Pages