विश्वभूषण डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानच्या जयंती महोत्सव अध्यक्षपदी मधुकर फलटणकर - Pandharpur Live

Breaking

Post Top Ad

Sunday, 17 March 2019

विश्वभूषण डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानच्या जयंती महोत्सव अध्यक्षपदी मधुकर फलटणकर

Pandharpur LIVE 17  March 2019

पंढरपूर -महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजभुषण पुरस्कार प्राप्त विश्वभुषण डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान पंढरपूर यांच्यावतीने साजरा होत असलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 128 व्या जयंती महोत्सव समिती 2018-19 च्या अध्यक्षपदी मधुकर फलटणकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली असल्याची माहिती प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष नगरसेवक डि.राज सर्वगोड यांनी दिली.

पंढरपूर येथे दरवर्षी प्रतिष्ठानच्यावतीने मोठ्या उत्साहात विविध सामाजिक उपक्रम राबवून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली जात असते. यावर्षीच्या नुतन कार्यकारणीची निवडी जाहीर करण्यात आल्या. यामध्ये सचिवपदी सोहन जैस्वाल, सहसचिवपदी आदम मुजावर, कार्याध्यक्ष रिहाना आतार, उपाध्यक्ष रमेश सासवडकर, वंदना कसबे, सुभाष आवळे, खजिनदार आदम बागवान, निमंत्रक  राबिया शेख, अजिंक्य देवमारे, स्वागताध्यक्षपदी आण्णा बंडगर, प्रसिध्दी प्रमुखपदी लखन माने यांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या. सदरच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी सुभाष हुंगे-पाटील होते.

यावेळी संस्थापक सचिव अनिल ननवरे सर, मामा फलटणकर, दत्तात्रय माने, सुहास भाळवणकर, प्रभाकर गायकवाड, पद्‌माकर सर्वगोड, सौ.विना तिरपुडे, शफीया पठाण, सुनिता सासवडकर, नितीन सर्वगोड, देवानंद इटकर,तानाजी सुतकर, रोहित जाधव, बालाजी देशमाने, स्वप्निल मोरे, अक्षय लोखंडे, अमित जाधव, पवनरत्न लोखंडे,सुरज पावले, सोमनाथ साठे, संतोष बंडगर, शंकर वायचळ, आनंद भागानगरे, सुरज कुकडे यांच्यासह आदि कार्यकर्ते उपस्थित होते.

📲पंढरपूर लाईव्ह वरील ताज्या बातम्या पहाण्यासाठी खालील लिंकला क्लीक करुन आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करा, पंढरपूर लाईव्ह चे अँड्रॉईड अॅप्लीकेशन.

➡️पंढरपूर लाईव्ह वर आपल्या बातम्या व जाहिराती देण्यासाठी संपर्क साधा- 7972287368, 7083980165कार्यालय- शिवयोगी मंगल भवन, कर्मयोगी नगर, लिंक रोड, पंढरपूरMail- livepandharpur@gmail.com 


No comments:

Post a Comment

Pages