खळबळजनक... १२ वर्षीय मुलाचा १५ वर्षीय मुलीवर बलात्कार... मुलगी चार महिन्यांची गर्भवती !

Pandharpur LIVE 3 March 2019


पालघर : पालघर जिल्ह्यातील मोखाडा येथे एका १२ वर्षीय अल्पवयीन मुलाने १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पीडीत मुलगी ४ महिन्यांची गर्भवती असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. आरोपी फरार असून आरोपीविरोधात पोस्को कायद्याअतंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला  आहे. या घटनेने मोखाडामध्ये मोठी खळबळ उडाली असून पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

📲पंढरपूर लाईव्ह वरील ताज्या बातम्या पहाण्यासाठी खालील लिंकला क्लीक करुन आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करा, पंढरपूर लाईव्ह चे अँड्रॉईड अॅप्लीकेशन.

➡️पंढरपूर लाईव्ह वर आपल्या बातम्या व जाहिराती देण्यासाठी संपर्क साधा- 7972287368, 7083980165कार्यालय- शिवयोगी मंगल भवन, कर्मयोगी नगर, लिंक रोड, पंढरपूरMail- livepandharpur@gmail.com 

पालगर जिल्ह्यातील मोखाडा येथील दांडवळ गावात बलात्काराचा गंभीर प्रकार उघडकीस आला. पीडीत मुलीला त्रास होत असल्याने तिला मोखाडा येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासल्यानंतर पीडीत मुलगी चार महिन्यांची गर्भवती असल्याचे उघड झाले. पीडीत मुलीला पुढील उपचारासाठी मुंबईतील जे.जे रूग्णालयात दाखल करण्यात येणार आहे. बलात्कारप्रकरणी आरोपीविरोधात मोखाडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.