माढ्याच्या राजकारणाला वेगळं वळण..! धवलसिंह मोहिते-पाटील शरद पवारांच्या भेटीला - Pandharpur Live

Breaking

Post Top Ad

Wednesday, 20 March 2019

माढ्याच्या राजकारणाला वेगळं वळण..! धवलसिंह मोहिते-पाटील शरद पवारांच्या भेटीला

Pandharpur LIVE 20 March 2019


रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या भाजपा प्रवेशानंतर माढ्याच्या राजकारणाला वेगळंच वळण लागलं असून रणजितसिंह मोहिते-पाटील यांचे चुलतबंधु व कट्टर राजकीय विरोधक असलेले शिवसेना सहसंपर्क नेते डॉ.धवलसिंह मोहिते-पाटील यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची भेट घेतली आहे. या भेटीनंतर माढ्यातून राष्ट्रवादीचे तिकीट कोणाला मिळणार? याकडे संपुर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागुन राहिले आहे. 

मुंबईत डॉ. धवलसिंह मोहिते-पाटील आणि शरद पवार यांच्या भेटीदरम्यान नेमकी कोणकोणत्या बाबीवर चर्चा झाली ते अद्याप समोर आले नाही. परंतु आता राष्ट्रवादीकडून माढ्याचे उमेदवार म्हणून धवलसिंह मोहिते-पाटील यांना मैदानात उतरवले जाईल अशी चर्चा चांगलीच रंगलेली आढळून येत आहे. 📲पंढरपूर लाईव्ह वरील ताज्या बातम्या पहाण्यासाठी खालील लिंकला क्लीक करुन आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करा, पंढरपूर लाईव्ह चे अँड्रॉईड अॅप्लीकेशन.

➡️पंढरपूर लाईव्ह वर आपल्या बातम्या व जाहिराती देण्यासाठी संपर्क साधा- 7972287368, 7083980165कार्यालय- शिवयोगी मंगल भवन, कर्मयोगी नगर, लिंक रोड, पंढरपूरMail- livepandharpur@gmail.com No comments:

Post a Comment

Pages