पांडुरंगाच्या महाद्वारात जनसमुदायासमोर पोलिस निरीक्षकाने केला आमदार भालके यांचा अवमान... आमदार भारत भालके व पोलीस निरीक्षक साळोखे यांच्यात शाब्दीक चकमक... - Pandharpur Live

Breaking

Post Top Ad

Thursday, 14 March 2019

पांडुरंगाच्या महाद्वारात जनसमुदायासमोर पोलिस निरीक्षकाने केला आमदार भालके यांचा अवमान... आमदार भारत भालके व पोलीस निरीक्षक साळोखे यांच्यात शाब्दीक चकमक...

Pandharpur LIVE 14 March 2019



अतिक्रमण मोहिमेत वृध्द महिलांना मारहाण केल्याने भालके संतापले

पंढरपूर, दि.१४ (प्रतिनिधी) पंढरपूरचे आमदार भारत भालके आणि पोलीस निरीक्षक विक्रम साळोखे यांच्यात जोरदार शाब्दीक चकमक झाली. अतिक्रमण मोहीम राबवताना एका वृध्द महिलेला पोलिसांकडून मारहाण झाल्यासंबंधी अधिक माहिती घेण्यासाठी व महिला विक्रेत्यांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी आ. भालके आज श्रीविठ्ठलाच्या महाद्वारात गेले होते. यावेळी चर्चा करताना आ.भारत भालके यांनी पोलीस निरीक्षक साळोखे यांना याबाबत विचारणा केली असताना साळोखे यांनी आ.भालके यांच्याशी प्रोटोकॉल न पाळता असभ्य वर्तन करत त्यांचा अवमान केला.

श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर परिसरातील अतिक्रमीत व्यापाऱ्यांचे, पोलिसांनी दांडेलशाहीने दुकाने हटविल्याची तक्रार व्यापाऱ्यांनी केल्याने भालके शहनिशा करण्यासाठी गेले असता साळोखे यांनी भालकेशी असभ्य वर्तन केले. तेंव्हा संतप्त झालेल्या भालके यांनी साळोखे यांची चांगलीच कानउघाडणी केली.

पोलीस निरीक्षक साळोखे यांची
मंदिर सुरक्षेच्या सुरक्षा व्यवस्थेसाठी काही दिवसापूर्वी नियुक्ती करण्यात आलीय. पदभार घेतल्यानंतर साळोखे यांनी मंदिर परिसरातील अतिक्रमण काढण्यास सुरूवात केली.  यामध्ये रस्त्यांवर बसून हारफुले, चुडे, माळा आदी वस्तू विकणार्‍यांना किरकोळ विक्रीत्याना बसण्यास मनाई केली.

ही कारवाई करताना एका ऐंशी वर्षांच्या महिलेच्या हातावर काठी मारुन विक्रीचे साहित्य उधळून देण्यात आल्याचा आरोप विक्रेत्यांनी केला आहे.

या जुलमी कारवाईमुळे भयभीत झालेल्या महिला व्यापाऱ्यांनी आमदार भालके यांच्या कानावर ही बाब घातली. सदर घटनेची शहनिशा करण्यासाठी भालके आज मंदिर परिसरात गेल्यानंतर व्यापाऱ्यांकडून माहिती जाणून घेत असताना साळोखे हजर झाले.

आणि कारवाईचे समर्थन करीत साळोखे यांनी आमदार भालके समोर एका वयोवृद्ध महिलेला असभ्य भाषा वापरली.

साळोखे यांच्या या सिंघम स्टाईलमुळे भालके यांनी दम देत असलेल्या महिलेचे वय आपल्या आईच्या वया इतके आहे सभ्यतेने बोला असे सूचित केले मात्र साळोखे यांनी आपला पोलिसी खाक्या सोडला नाही शर्टची बटणे उघडी ठेवून आणि डोक्यावर टोपी न घालता लोकप्रतिनिधीशी बोलत आहात हे भालके यांनी लक्षात आणून दिल्यानंतर देखील साळोखे यांच्या वर्तनात सुधारणा झाली नाही

तेंव्हा उपस्थित असलेले भालके समर्थक आणि शंभरहुन अधिक व्यापारी साळोखेच्या असभ्य वर्तनावर संतप्त झाले दोघांमध्ये तू तू मैं मैं इतकी वाढली की प्रकरण हात घाईवर आले शेवटी उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांनी भालके यांना शांत करुन त्यांना बाजूला नेले.

अतिक्रमण कारवाई करा, पण सबुरीने...

पंढरपूर हे वारीवर जगणारे गाव आहे छोटे मोठे व्यवसाय करुन लोक पोट भरतात वाहतुकीला अडचण येत असेल तर त्यांना पर्यायी जागा द्या पण त्यांच्या उदरनिर्वाहावर गदा आणू नका, गरीब व्यापारी आहेत हातावरचे पोट आहे मारहाण करु नका मालाचे नुकसान करु नका अशी विनंती आपण पोलीस अधिकाऱ्यांना केली पण साळोखे हे अधिकारी असभ्य भाषेत बोलत होते. त्यांचे वर्तन आपण वरिष्ठांच्या कानावर घालणार असल्याचे भालकेनी स्पष्ट केले.


📲पंढरपूर लाईव्ह वरील ताज्या बातम्या पहाण्यासाठी खालील लिंकला क्लीक करुन आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करा, पंढरपूर लाईव्ह चे अँड्रॉईड अॅप्लीकेशन.

➡️पंढरपूर लाईव्ह वर आपल्या बातम्या व जाहिराती देण्यासाठी संपर्क साधा- 7972287368, 7083980165कार्यालय- शिवयोगी मंगल भवन, कर्मयोगी नगर, लिंक रोड, पंढरपूरMail- livepandharpur@gmail.com 



No comments:

Post a Comment

Pages