कोल्हापूर जिल्ह्यात शांततेत मतदान कोल्हापूर 70.7, हातकणंगले 70.28 टक्के मतदान - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Wednesday, 24 April 2019

कोल्हापूर जिल्ह्यात शांततेत मतदान कोल्हापूर 70.7, हातकणंगले 70.28 टक्के मतदान


कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीमध्ये दिनांक 23 एप्रिल 2019 रोजी शांततेत व सुरळीतरित्या मतदान झाले. 47-कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात 70.7 टक्के तर 48-हातकणंगले मतदारसंघात  70.28 टक्के मतदान झाले.  कोल्हापूर जिल्ह्यात शांततेत, सुरळीत व बहुसंख्येने मतदान झाल्याबद्दल कोल्हापूरचे  जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणुक अधिकारी दौलत देसाई यांनी कोल्हापुरच्या जातेला धन्यवाद दिले.
47-कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात एकूण 18 लाख 74 हजार 345 मतदारांपैकी 9 लाख 57 हजार 183 पुरुष, 9 लाख 17 हजार 143 स्त्रीया व इतर 19 असे मतदार आहेत. यापैकी प्रत्यक्षात 13 लाख 25 हजार 174 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये पुरुष 6 लाख 93 हजार 592 व स्त्रीया 6 लाख 31 हजार 578 यांचा समावेश आहे. एकूण 70.7 टक्के मतदान झाले. मतदार संघनिहाय मतदान पुढीलप्रमाणे आहे.
271-चंदगड मतदार संघात 1 लाख 6 हजार 98 पुरुष मतदारांना व 1 लाख 3 हजार 971 स्त्री मतदारांनी अशा एकूण 2 लाख 10 हजार 69 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. 272-राधानगरी मतदार संघात 1 लाख 20 हजार 926 पुरुष मतदार,  1 लाख 10 हजार 07 स्त्री व इतर 1 मतदार अशा एकूण 2 लाख 30 हजार 934 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. 273-कागल मतदार संघात 1 लाख 23 हजार 937 पुरुष, 1 लाख 17 हजार 812 स्त्री मतदार अशा एकूण 2 लाख 41 हजार 749 मतदारांनी  मतदानाचा  हक्क बजावला. 274-कोल्हापूर दक्षिण मतदार संघात 1 लाख 20 हजार 862 पुरुष, 1 लाख  6 हजार 502 स्त्री  व इतर 3 मतदार अशा एकूण 2 लाख 27 हजार 367 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. 275-करवीर मतदार संघात 1 लाख 23 हजार 290 पुरुष, 1 लाख 4 हजार 512 स्त्री मतदार अशा एकूण 2 लाख 27 हजार 802 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. 276-कोल्हापूर उत्तर मतदार संघात 98 हजार 479 पुरुष, 88 हजार 874 स्त्री मतदार अशा एकूण 1 लाख 87 हजार 253 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
48-हातकणंगले मतदार संघात 17  लाख 72 हजार 563 मतदार आहेत. यापैकी 9 लाख 14 हजार 363 पुरुष मतदार, 8 लाख 58 हजार 133 स्त्री मतदार व इतर 67 मतदारांचा समावेश आहे. यापैकी 12 लाख 45 हजार 797 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला यामध्ये 6 लाख 57 हजार 652 पुरुष,  5 लाख 88 हजार 127 स्त्री व इतर 18 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.  यामध्ये पुरुष 71.92  टक्के, महिला 68.54 टक्के, व इतर 26.87 टक्के असे एकूण 70.28 टक्के मतदान झाले. मतदार संघानिहाय मतदान पुढीलप्रमाणे आहे.
277-शाहुवाडी मतदार संघात 1 लाख 592  पुरुष मतदार, तर  91 हजार 185 स्त्री मतदार व इतर 1 असे एकूण 1 लाख 91 हजार 778 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. 278-हातकणंगले मतदार संघात 1 लाख 31 हजार 188 पुरुष, 1 लाख 11 हजार 610 स्त्री मतदार  व इतर 4 अशा एकूण 2 लाख 42 हजार 802 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. 279-इचलकरंजी मतदार संघात 1 लाख 07 हजार 296 पुरुष, 92 हजार 381 स्त्री मतदार व इतर 11 अशा एकूण 1 लाख 99 हजार 688 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. 280-शिरोळ मतदार संघात 1 लाख 19 हजार 160 पुरुष, 1 लाख  9 हजार 870 स्त्री व इतर 1 अशा एकूण 2 लाख 29 हजार 031 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. 283-इस्लामपूर मतदार संघात 98 हजार 514 पुरुष, 87 हजार 653 स्त्री अशा एकूण 1 लाख 86 हजार 167 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. 284-शिराळा मतदार संघात 1 लाख 902 पुरुष, 95 हजार 428 स्त्री मतदार व इतर 1 अशा एकूण 1 लाख  96 हजार 331 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

000000


-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 39 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 7972287368

Mail- livepandharpur@gmail.com 

add