श्री विठ्ठल इंजिनिअरींगमधील या वर्षीचा ‘बेस्ट आऊट गोईंग स्टुडंट’ ठरला बालाजी सुरवसे - Pandharpur Live

Breaking

Post Top Ad

Sunday, 21 April 2019

श्री विठ्ठल इंजिनिअरींगमधील या वर्षीचा ‘बेस्ट आऊट गोईंग स्टुडंट’ ठरला बालाजी सुरवसे


पंढरपूरः-येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित इंजिनिअरींग कॉलेजच्या मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागामधील अंतिम वर्षात शिक्षण घेणारे बालाजी झुंबर सुरवसे  हे यंदाचे बेस्ट आऊट गोईंग स्टुडंट’ ठरले असून हुशार आणि होतकरु विद्यार्थ्याला हा पुरुस्कार मिळाल्याने सर्वच विद्यार्थ्यांचा उत्साह द्विगुणीत झाला आहे आणि विशेष म्हणजे याचवेळी बालाजी यांची ‘अॅटलास कोपको’ या नामांकित मल्टीनॅशनल कंपनीत कॅम्पस इंटरव्हयूमधून सिलेक्शन देखील झाले असून वार्षिक पॅकेज जवळपास रु.नऊ लाख इतकी आहे. यामुळे एकाच वेळी दुहेरी मुकुट मिळविल्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची स्वेरीत चांदी होतेय अशीच चर्चा पंढरपूर पंचक्रोशीत होत आहे.दरवर्षीप्रमाणे स्वेरी इंजिनिअरींग कॉलेजमधून बेस्ट आऊट गोईंग स्टुडंट पुरस्कार देण्याची परंपरा यंदाही कायम राखली असून यासाठी डॉक्टर,पोलिस अधिकारीपत्रकारसमाजसेवकजेष्ठ नागरिक व प्राध्यापक असे विविध क्षेत्रातील सदस्य असलेली समिती नेमली जाते. या महाविद्यालयात प्रवेश घेतल्यापासुन प्रत्येक विद्यार्थी सुसंस्कारीतपरिपुर्णतेकडे वाटचाल करणारागुणसंपन्न असणारा असे अनेक विशेषणांचा मुकुट चढविलेला असल्यामुळे या निवड समितीतील प्रत्येक सदस्यांना ‘उत्कृष्ठ विद्यार्थी’ निवडताना तारेवरची कसरत करावी लागते. पात्र विद्यार्थ्यांच्या मुलाखतीतून अखेर मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागातून बालाजी झुंबर सुरवसेकॉम्पुटर सायन्स अॅन्ड इंजिनिअरींग मधून संजीवनी शिवाजी पवारसिव्हील इंजिनिअरींगमधून आदेश सुनिल मनगिरेइलेक्ट्रॉनिक्स अॅन्ड टेलिकम्यूनिकेशन इंजिनिअरींग विभागातून बानू दत्तात्रय चव्हाण  तर एम.बी. ए.मधून महेश परमेश्वर पाटील या विद्यार्थ्यांची विभागवार बेस्ट आऊट गोईंग स्टुडंट म्हणून निवड  झाली आणि या सर्वांमधून समितीच्या परिक्षणनिरक्षण व समिक्षणातून महाविद्यालयाचा ‘बेस्ट स्टुडंट’ म्हणून मेकॅनिकल इंजिनिअरींगचा बालाजी सुरवसे यांची वर्णी लागली. उत्कृष्ठ विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले. यामध्ये वसुंधरा कृषीशास्त्र महाविद्यालयाचे प्रमुख व रेशीम शेतीचे प्रचारक व प्रसारक डॉ.  संतोष थिटे, सोलापुर जिल्हा हिंदी अध्यापक संघाचे सहसचिव डॉ. शिराळ, बाबुराव पाटील महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. कदम, संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे आदी उपस्थित होते. यावेळी डॉ. स्नेहा रोंगे, शिवाजी रणदिवे, मधुकर जाधव, पांडुरंग देशमुख, विश्वस्त प्रा. सुरज रोंगे, कॅम्पस इन्चार्ज प्रा. एम.एम.पवार, बी.फार्मसीचे प्राचार्य डॉ. अमित गंगवाल, डिप्लोमा पॉलिटेक्निकचे प्राचार्य डॉ.एन.डी. मिसाळडी.फार्मसीचे प्राचार्य प्रा. सतीश मांडवे, अभियांत्रिकीचे उपप्राचार्य डॉ. दिनकर यादव, विद्यार्थी अधिष्ठाता डॉ. अभय उत्पातसर्व अधिष्ठातासर्व विभागप्रमुख, प्राध्यापक वर्गविद्यार्थी प्रतिनिधी अक्षयकुमार कोरे, पालक व विद्यार्थी यांनी सर्वानी बालाजी सुरवसे यांचे अभिनंदन केले.

-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 39 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 7972287368

Mail- livepandharpur@gmail.com 

No comments:

Post a Comment

Pages