पोलीस बंदोबस्त व्यवस्थापन प्रणाली अॅपवर स्वेरीत कार्यशाळा संपन्न - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Monday, 8 April 2019

पोलीस बंदोबस्त व्यवस्थापन प्रणाली अॅपवर स्वेरीत कार्यशाळा संपन्न


स्वेरीमध्ये पोलीस बंदोबस्त व्यवस्थापन प्रणाली अॅपवर  एकदिवशीय कार्यशाळा संपन्नझाली प्रसंगी पोलीस अधिकारी राजेश गवळी व स्वेरीचे प्राध्यापक वर्ग प्रा. प्रा. सोमनाथ झांबरे, रोहित कोंडे व इतर.

 पंढरपूर - गोपाळपूर (ता. पंढरपूर)श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट, पंढरपूरच्या पदवी व पदविका
अभियांत्रिकीच्या शिक्षक व विद्यार्थ्यांनी केलेल्या पोलीस बंदोबस्त व्यवस्थापन प्रणाली अँड्रॉइड अॅप्लीकेशन’ आणि वेबसाईट वरती सोलापूर जिल्ह्यातील सर्व हजेरी मेजर यांची एकदिवसीय कार्यशाळा पार पडली.
          स्वेरीत आयोजिलेल्या या कार्यशाळेत पोलीस बंदोबस्त तयार करणे, क्षेत्र वाटप अहवाल, गैरहजेरी अहवाल या आणि अशा अनेक विषयांवर सॉफ्टवेअरच्या माध्यमातून कसे काम करावे ? या सर्व विषयांवर एक दिवशीय कार्यशाळेत माहिती देण्यात आली. या कार्यशाळेसाठी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यातील जवळपास ८० हजेरी मेजर उपस्थित होते. यामध्ये पंढरपूर शहर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक  राजेश गवळी यांनी पोलीस बंदोबस्त व्यवस्थापन प्रणाली या ऑनलाईन पद्धतीवर मार्गदर्शन केले.या ऑनलाईन बंदोबस्त व्यवस्थापन प्रणालीमुळे सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी यांची अनेक महत्वाची कामे अत्यंत जलदगतीने व अचूणपणे पार पाडता येत असल्याने सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. याशिवाय पोलीस बंदोबस्तावेळी येणाऱ्या अनेक समस्या या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून अगदी सहजतेने कोणत्याही ठिकाणावरून पार पाडता येतात. तसेच त्यांनी कार्यक्रमाच्या उदघाटन प्रसंगी स्वेरीच्या सर्व टीमचे कौतुक केले. ते पुढे म्हणाले कि, ‘हे सॉफ्टवेअर बनविण्यामध्ये स्वेरी कॉलेजचे शिक्षक व विद्यार्थी यांनी अहोरात्र काम करत अगदी अल्पावधीतच हे सॉफ्टवेअर सोलापूर ग्रामीण पोलीस दलासाठी बनवून देण्यामध्ये अत्यंत महत्वाची भूमिका पार पडली. ही कार्यशाळा सुरळीतपणे पार पडण्यासाठी पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ. सागर कवडे, संस्थेचे विश्वस्त प्रा. सुरज रोंगे तसेच प्रा. अवधूत भिसे, प्रा. सोमनाथ झांबरे, प्रा. अमेय भातलवंडे, सांस्कृतिक विभागाचे प्रमुख प्रा. करण पाटील, इतर प्राध्यापकवर्ग व शिक्षकेतर कर्मचारी पदवी अभियांत्रिकीच्या अंतिम वर्षातील रोहित कोंडे, धवल द्यावनपल्ली,पदविका अभियांत्रिकीचे सिद्धेश खडकेतेजस पाटील,ऋषिकेश कोरडेयशराज चव्हाणप्रज्वल बेंडाळेअभिषेक वरपे,यांच्या सह आदी विद्यार्थी उपस्थित होते. प्रा. यशपाल खेडकर यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.


-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 39 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 7972287368

Mail- livepandharpur@gmail.com 

add