मातोश्री चॅरीटेबल फाऊंडेशनच्या वतीने हनुमान जयंतीदिनी रक्तदान शिबीर व काव्यसंमेलन - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Sunday, 21 April 2019

मातोश्री चॅरीटेबल फाऊंडेशनच्या वतीने हनुमान जयंतीदिनी रक्तदान शिबीर व काव्यसंमेलन कासेगाव:- सातवा मैल कासेगाव, तालुका पंढरपूर येथे डॉ. बी. आर पाटील यांच्या मातोश्री फार्महाऊसवर मातोश्री चॅरीटेबल फाउंडेशन च्या वतीने हनुमान जयंती दिनी रक्तदान शिबीर आणि काव्यसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी 50 रक्तदात्यांनी रक्तदान केले. प्रत्येक रक्तदात्यास हेल्मेट भेट देण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंढरपूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ. साधनाताई भोसले तर प्रमुख पाहुणे म्हणून पंढरपूर सोशल फाऊंडेशनचे अध्यक्ष पत्रकार भगवान वानखेडे हे उपस्थित होते. अध्यक्षांनी व प्रमुख पाहुण्यांनी मातोश्री फाउंडेशनच्या फलकाचे अनावरण केले. तसेच मातोश्री चॅरीटेबल फाउंडेशनच्या स्थापनेमागचा उद्देश फाऊंडेशनच्या उपाध्यक्षा डॉ. संगीता पाटील यांनी स्पष्ट केले. डॉ. बी. आर. पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करताना कठीण प्रसंगाचे वर्णन करत डॉक्टरही माणुस असतो, त्यालाही भावना असतात असे सांगुन वैद्यकीय क्षेत्रात काम करताना डॉक्टरांना येणार्‍या अडचणी व वेदनांचे दर्शन घडवून दिले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन बोलताना नगराध्यक्षा सौ.साधनाताई नागेश भोलसे यांनी रक्तदानाचे महत्व सांगुन येथील रक्तदान शिबीरामध्ये महिलांचा सहभाग लक्षणीय असल्याबाबत समाधान व्यक्त केले.


प्रमुख पाहुणे भगवान वानखेडे यांनी मातोश्री चॅरिटेबल फाऊंडेशनच्या कार्याचे कौतुक करत समाजात इतरांना कांहीतरी देण्यासाठी कार्यरत असणार्‍या अशा संस्थांची गरज असल्याचे सांगितले. 


कार्यक्रमास जीवन पाटील सर (मुख्याध्यापक), हैदराबादचे उद्योगपती प्रकाश पाटील, श्री. देशमुख (माजी महिला व बालकल्याण सभापती), समाजसेवक ओंकार बसवंती, हंसराज देशमुख, अजित देशमुख वन विभागाचे प्रमुख अहिरे, डॉ. शीतल पाटील, डॉ. येडगे, डॉ. बागडे, डॉ. शशिकांत रणवरे, सुनील जाधव, दिनू घायाळ आदी मान्यवर उपस्थित होते.  कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकाश भाऊ पाटील यांनी केले तर सूत्रसंचालन प्राध्यापक दत्ता खिलारे यांनी केले, आभार संगीता पाटील यांनी मानले. यावेळी कवी रवीराज सोनार, कवीराज सचिन कुलकर्णी, कवयत्री आशा पाटील, कवयत्री संगीता मासाळ यांनी आपल्या बहारदार कविता सादर केल्या. आई, वडील, पत्नी या नात्यांवील कवितांसोबतच निसर्गाच्या कविताही यावेळी या साहित्यीकांनी सादर केल्या. 

-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 39 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 7972287368

Mail- livepandharpur@gmail.com 

add