चंद्रभागेत बुडालेल्या त्या भाविकाचा मृतदेह आज सापडला - Pandharpur Live

Breaking

Post Top Ad

Friday, 5 April 2019

चंद्रभागेत बुडालेल्या त्या भाविकाचा मृतदेह आज सापडला


रविवार दि. ३१ मार्च रोजी पहाटेच्या ५ वाजण्याच्या सुमारास चंद्रभागेच्या पात्रात स्नान करत असताना नदीपात्रातील खड्ड्यांचा अंदाज न आल्याने बुडून बेपत्ता झालेल्या नांदेड जिल्ह्यातील त्या भाविकाचा मृतदेह आज देगाव हद्दीतील नदीपात्रात सापडला.
चंद्रभागेत बुडालेले गोविंद जनार्धन सुवर्णकार (वय 27, रा. देगलूर, जि. नांदेड) या भाविकाचा शोध कोळी समाजातील अनेक तरूण होडी चालकांच्या मदतीने गेली पाच दिवस घेत होते .गेल्या पाच दिवसा पासून मृतदेह न मिळण्याने नातेवाईक अत्यंत हताश झाले होते .
अखेर आज देगांव शिवारातील अमोल पाटील यांच्या शेतालगतच्या नदीपात्रात मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला.  याकामी नगरपरिषदेने एका बोटीची आणि चार कर्मचारी यांची मदत केली गेली होती .नगरपालिका प्रशासन आणि होडी चालवणारे कोळी बांधव गेल्या पाच दिवसांपासून अहोरात्र या भाविकाचा शोध घेत होते. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा करण्यात येत आहे.

-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 
तब्बल 39 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 
पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
 इफेक्ट बघा..! 
कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, 
                 पंढरपूर, जि. सोलापूर 413304
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  
उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 
Whats Up -  8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368
Mail- livepandharpur@gmail.com 

No comments:

Post a Comment

Pages