एम.एच.टी.-सी.ई.टी २०१९ सराव परीक्षेची नोंदणी करण्याचा आज शेवटचा दिवस - Pandharpur Live

Breaking

Post Top Ad

Tuesday, 9 April 2019

एम.एच.टी.-सी.ई.टी २०१९ सराव परीक्षेची नोंदणी करण्याचा आज शेवटचा दिवस

श्री.विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूटचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे. स्वेरी चिन्ह व अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रीयेचे अधिष्ठाता डॉ. पी.एस. कचरे.
रजिस्ट्रेशनची स्वेरीमध्ये मोफत सोय
पंढरपूरः- बारावी परिक्षेनंतर विद्यार्थ्यांना अभियांत्रिकीफार्मसी व वैद्यकीय विभागात प्रवेश कसा मिळेल ? याचे वेध लागते आणि यासाठी जणू ही एक स्पर्धाच सुरु होते. शासनाच्या एम.एच.टी.-सी.ई.टी. २०१९ परीक्षेच्या पार्श्वभूमीवर परीक्षेचा सराव व्हावा म्हणून शासनानेच ठरविलेल्या सराव परीक्षेसाठी नोंदणी करण्याची मुदत आज दि.१० एप्रिल २०१९ रोजी रात्री १२ वाजता संपत आहे. ज्यांनी या सराव परीक्षेस अद्याप रजिस्ट्रेशन केलेले नाही त्यांनी आज रात्री १२ वाजेपर्यंत रजिस्ट्रेशन करावे अन्यथा या सराव परीक्षेस बसता येणार नाही. यासाठी रजिस्ट्रेशन करण्याची मोफत सोय स्वेरीमध्ये केली आहे.’ अशी माहिती श्री.विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूट, पंढरपूरचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे यांनी दिली.
            अभियांत्रिकी व फार्मसीमध्ये प्रवेश घेण्यासाठी आवश्यक असणारी राज्य शासनाची एम.एच.टी.-सी.ई.टी.२०१९ ही परीक्षा दि.२ मे ते दि.१३ मे २०१९ दरम्यान होणार असून श्री. विठ्ठल अभियांत्रिकीच्या मोफत ऑनलाईन रजिस्टेशनच्या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांनी याचा फायदा घेतला आहे. आता याचा सराव व्हावा या हेतूने शासनाने सराव परीक्षेसाठी देखील स्वतंत्र रजिस्ट्रेशन करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार आज दि.१० एप्रिल २०१९ रात्री १२ वाजेपर्यंत महाराष्ट्र शासनाच्या अधिकृतwww.mhtcetpractisetest2019.offee.in या संकेतस्थळावर रजिस्ट्रेशन करता येणार आहे. दिलेल्या संकेतस्थळावरील फॉर्ममध्ये संपूर्ण नाव, मोबाईल नंबर, मेल आयडी, बारावी परीक्षेच्या हॉल तिकीटावरील सीट नंबर व सोलापुर जिल्हा निवडल्यानंतर सर्व सोयींनी युक्त असे केंद्र निवडावे. या सराव परीक्षेच्या सुवर्णसंधीचा लाभ बारावी (सायन्स) परिक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना घेता येणार आहे. या सराव परीक्षेचे रजिस्टेशन ते परीक्षा प्रक्रीयेबाबतच्या अधिक माहितीसाठी प्रा. यु.एल. अनुसे (मोबा. ९१६८६५५३६५)  व टोल फ्री क्र. १८०० ३००० ४१३१ यावर संपर्क साधावा असे आवाहन अभियांत्रिकी (पदवी) प्रवेश प्रक्रीयेचे अधिष्ठाता डॉ. पी.एस. कचरे यांनी केले आहे.  
छायाचित्र-श्री.विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूटचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे. स्वेरी चिन्ह व अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रीयेचे अधिष्ठाता डॉ. पी.एस. कचरे.एम.एच.टी.-सी.ई.टी २०१९ सराव परीक्षेची नोंदणी करण्याचा आज शेवटचा दिवस
रजिस्ट्रेशनची स्वेरीमध्ये मोफत सोय
पंढरपूरः- बारावी परिक्षेनंतर विद्यार्थ्यांना अभियांत्रिकीफार्मसी व वैद्यकीय विभागात प्रवेश कसा मिळेल ? याचे वेध लागते आणि यासाठी जणू ही एक स्पर्धाच सुरु होते. शासनाच्या एम.एच.टी.-सी.ई.टी. २०१९ परीक्षेच्या पार्श्वभूमीवर परीक्षेचा सराव व्हावा म्हणून शासनानेच ठरविलेल्या सराव परीक्षेसाठी नोंदणी करण्याची मुदत आज दि.१० एप्रिल २०१९ रोजी रात्री १२ वाजता संपत आहे. ज्यांनी या सराव परीक्षेस अद्याप रजिस्ट्रेशन केलेले नाही त्यांनी आज रात्री १२ वाजेपर्यंत रजिस्ट्रेशन करावे अन्यथा या सराव परीक्षेस बसता येणार नाही. यासाठी रजिस्ट्रेशन करण्याची मोफत सोय स्वेरीमध्ये केली आहे.’ अशी माहिती श्री.विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूट, पंढरपूरचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे यांनी दिली.
            अभियांत्रिकी व फार्मसीमध्ये प्रवेश घेण्यासाठी आवश्यक असणारी राज्य शासनाची एम.एच.टी.-सी.ई.टी.२०१९ ही परीक्षा दि.२ मे ते दि.१३ मे २०१९ दरम्यान होणार असून श्री. विठ्ठल अभियांत्रिकीच्या मोफत ऑनलाईन रजिस्टेशनच्या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांनी याचा फायदा घेतला आहे. आता याचा सराव व्हावा या हेतूने शासनाने सराव परीक्षेसाठी देखील स्वतंत्र रजिस्ट्रेशन करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार आज दि.१० एप्रिल २०१९ रात्री १२ वाजेपर्यंत महाराष्ट्र शासनाच्या अधिकृतwww.mhtcetpractisetest2019.offee.in या संकेतस्थळावर रजिस्ट्रेशन करता येणार आहे. दिलेल्या संकेतस्थळावरील फॉर्ममध्ये संपूर्ण नाव, मोबाईल नंबर, मेल आयडी, बारावी परीक्षेच्या हॉल तिकीटावरील सीट नंबर व सोलापुर जिल्हा निवडल्यानंतर सर्व सोयींनी युक्त असे केंद्र निवडावे. या सराव परीक्षेच्या सुवर्णसंधीचा लाभ बारावी (सायन्स) परिक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना घेता येणार आहे. या सराव परीक्षेचे रजिस्टेशन ते परीक्षा प्रक्रीयेबाबतच्या अधिक माहितीसाठी प्रा. यु.एल. अनुसे (मोबा. ९१६८६५५३६५)  व टोल फ्री क्र. १८०० ३००० ४१३१ यावर संपर्क साधावा असे आवाहन अभियांत्रिकी (पदवी) प्रवेश प्रक्रीयेचे अधिष्ठाता डॉ. पी.एस. कचरे यांनी केले आहे.  

-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 39 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 7972287368

Mail- livepandharpur@gmail.com 

No comments:

Post a Comment

Pages