पंतप्रधान मोदींचे आज वाराणसीत शक्तिप्रदर्शन - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Thursday, 25 April 2019

पंतप्रधान मोदींचे आज वाराणसीत शक्तिप्रदर्शन


पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसीतून उद्या शुक्रवारी उमेदवारी अर्ज भरणार आहेत. त्याआधी मोदी आज दुपारी सात किलोमीटर लांब असा रोड शो करुन वाराणसीत शक्तिप्रदर्शन करणार आहेत. उमेदवारी अर्ज भरण्याआधी विरोधकांना मोदी लाट आजही कायम आहे हे दाखवण्यासाठी या रोड शो मध्ये भाजपतर्फे शक्तीप्रदर्शन केले जाणार आहे.
मदनमोहन मालवियांच्या पुतळ्याला अभिवादन करुन मोदी रोडशोची सुरुवात करणार आहेत. त्यानंतर संध्याकाळी सहाच्या सुमारास मोदी गंगेकाठी आरती करतील. गंगा आरतीनंतर मोदी काशी विश्वनाथाचे दर्शन घेणार आहेत.


पंतप्रधान मोदींचा हा रोड शो बीएचयूपासून दशाश्वमेघ घाटापर्यंत असेल. मागील विधानसभा निवडणुकांच्या वेळीही मोदींनी याच ठिकाणापासून रोड शो सुरू केला होता. या रोड शो दरम्यान मोदींच्या स्वागतासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. यावेळी वाराणसीत राहणारे वेगवेगळ्या राज्यातील लोक पारंपरिक पद्धतीने मोदींचे स्वागत करणार आहेत.
नरेंद्र मोदी यांचा हा रोड शो अस्सी मोड, मुमुक्षु भवन, आनंदमयी हॉस्पिटल, शिवाला तिराहा, सोनारपुरा, जगमबाडीमधून गोदौलिया पोहोचेल. या रोड शो साठी रस्त्याच्या दुतर्फा बॅरिकेट्स लावले गेले आहेत. शहरात मोदींच्या स्वागताचे फलक जागोजागी लावले गेले आहेत. या रोड शो दरम्यान गुलाबांच्या पाकळ्यांचा मोदींवर वर्षाव केला जाणार आहे.

या सात किलोमीटरचा रोड शो काशी विश्वनाथ मंदिराच्या द्वाराजवळ संपेल. या रोड शोसाठी पाच लाख लोकांना बोलावण्यात आल्याचे वृत्त आहे. या रॅलीसाठी भाजपच्या बड्या नेत्यांनी गेल्या काही दिवसांपासून वाराणसीत ठाण मांडले आहे. भाजपचे अध्यक्ष अमित शाह स्वतः वाराणसीत ठाण मांडून आहेत.
या शो साठी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, निर्मला सीतारामण, सुषमा स्वराज, पीयूष गोयल, उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासारखे दिग्गज नेते सहभागी होणार आहेत. शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख प्रकाश सिंह बादल, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, लोक जनशक्ती पार्टीचे अध्यक्ष रामविलास पासवानही या रोड शोला उपस्थित राहणार आहेत.
या रोड शो साठी मोदी दुपारी अडीच वाजता बाबतपूर विमानतळावर पोहोचतील. तिथून हेलिकॉप्टरने ते बीएचयूच्या हेलिपॅडवर उतरतील. दुपारी तीन वाजता मदन मोहन मालवीय यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून रोड शो सुरु होईल, असे भाजपातर्फे सांगण्यात आले.

-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 40 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 7972287368

Mail- livepandharpur@gmail.com 

add