महानगरपालिकांच्या पोटनिवडणुकांसाठी प्रारूप मतदार याद्यांची 17 रोजी प्रसिद्धी - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Sunday, 12 May 2019

महानगरपालिकांच्या पोटनिवडणुकांसाठी प्रारूप मतदार याद्यांची 17 रोजी प्रसिद्धी


बृहन्मुंबईउल्हासनगरनवी मुंबईपुणेकोल्हापूरनाशिकमालेगावपरभणीचंद्रपूर आणि कल्याण-डोंबिवली या महानगरपालिकांमधील 20 रिक्तपदांच्या पोटनिवडणुकीकरिता 17 मे 2019 रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात येणार आहेतअशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे दिली.

श्री. सहारिया यांनी सांगितलेया निवडणुकांकरिता 10 एप्रिल 2019 रोजी अस्तित्वात असलेल्या विधानसभा मतदारसंघाच्या मतदार याद्या ग्राह्य धरण्यात येतील. त्याआधारावर तयार करण्यात येणाऱ्या प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या संबंधित ठिकाणी 17 मे 2019 रोजी प्रसिद्ध केल्या जातील. त्या दिवसापासून त्यावर 21 मे 2019 पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील. प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या 27 मे 2019 रोजी प्रसिद्ध केल्या जातील. मतदान केंद्रांची यादी व मतदान केंद्रनिहाय मतदार याद्या 29 मे 2019 रोजी प्रसिद्ध केल्या जातील.
प्रभागनिहाय मतदार याद्या तयार करताना विधानसभा मतदारसंघाच्या यादीप्रमाणेच प्रभागनिहाय मतदार याद्यांमध्ये मतदारांची नावे व पत्ते कायम ठेवले जातात. या याद्यांमध्ये नवीन नावांचा समावेश करणेनावे वगळणे अथवा नावे किंवा पत्त्यांमध्ये दुरूस्ती करणे इत्यादी स्वरूपाची कार्यवाही राज्य निवडणूक आयोगाकडून केली जात नाही. हरकती व सूचनांच्या अनुषंगाने केवळ मतदार याद्यांचे विभाजन करताना लेखनिकांकडून होणाऱ्या चुकामतदाराचा चुकून प्रभाग बदलणेविधानसभेच्या यादीत नाव असूनही प्रभागाच्या यादीत नाव नसणे आदींसंदर्भातील दुरूस्त्या करण्यात येतातअशी माहितीही श्री. सहारिया यांनी दिली.
महानगरपालिकानिहाय पोटनिवडणूक होणारे प्रभाग: पुणे- 42अ42ब (हद्दवाढ क्षेत्रासाठी)24ब आणि 1अउल्हासनगर- 1ब आणि 5अनाशिक- 10 डपरभणी- 11अ आणि 3डमालेगाव- 6कचंद्रपूर- 6ब आणि 13बकोल्हापूर- 28 आणि 55कल्याण-डोंबिवली- 26नवी मुंबई- 29बृहन्मुंबई- 322876 आणि 81.  
-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 40 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com 

add