रमाई आवास योजनेच्या लाभार्थ्यांना 2 मे पासून वाळू उपलब्ध होणार - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Thursday, 2 May 2019

रमाई आवास योजनेच्या लाभार्थ्यांना 2 मे पासून वाळू उपलब्ध होणार

नगरसेवक डि.राज सर्वगोड यांच्या पाठपुराव्यास यश 

पंढरपूर शहरातील रमाई आवास योजनेअर्तंगत घरकुलांसाठी निधी उपलब्ध होऊनही वाळू अभावी बहुतांश घरकुलांचे काम रखडले असल्याचे दिसून येते.घरकुल योजनांच्या लाभार्थ्यांना शासकिय दरात तर अर्थिक द्रष्ट्या दुर्बल घटकांना 5 ब्रास वाळू मोफत मिळावी असे आदेश शासनाने 5 ऑक्टोंबर 2018 रोजी दिले होते.या आदेशाची अंमलबजावणी करुन  शहरातील रमाई घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना वाळूसाठीचे परमीट उपलब्ध करुन द्यावेत अशी मागणी नगरसेवक डि.राज सर्वगोड यांनी जिल्हाधिकारी सोलापूर व तहसिलदार मधुसुदन बर्गे यांच्याकडे 10 ऑक्टोंबर 2018 रोजी निवेदनाद्वारे केली.पंढरपूर शहरात रमाई आवास योजनेच्या 500 घरकुलांना मंजुरी मिळाली असून निधीही उपलब्ध झाला आहे.मात्र वाळूअभावी सदर घरकुलांचे काम रखडले आहे.ही समस्या लक्षात घेवून निवेदन देण्यात आले होते व सातत्याने या बाबत पाठपुरावा करण्यात येते होता. या निवेदनाची दखल घेत जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्या आदेशानुसार 2 मे पासून घरकुल लाभार्थ्यांना वाळूसाठी आवश्यक ते परमिट उपलब्ध करुन दिले जातील अशी माहीती तहसिलदार मधुसूदन बर्गे यांनी दिली आहे.      या बाबत अधिक माहीती देताना नगरसेवक डि.राज सर्वगोड म्हणाले की,पंढरपुर शहरात रमाई आवास योजनेअर्तंगत 261 घरकुलांसाठी निधी उपलब्ध झाला आहे.मात्र वाळू अभावी अनेक घरकुलांचे काम ठप्प होतेे.घरकुलाच्या लाभार्थ्यांना शासकिय दराने उपलब्ध करुन द्यावी अशी मागणी आम्ही निवेदनाद्वारे केली होती.या मागणीची दखल घेत आता पंढरपूर शहराबरोबरच तालुक्यातीलही विविध योजनाअर्तंगत घरकुल मंजुर झालेल्या लाभार्थ्यांना शासनाने निश्‍चीत केलेल्या स्वामित्वधनाची(रॉयल्टी) पुर्तता केल्यानंतर वाळू उपलब्ध होणार आहे तर अर्थिक द्रष्टया दुर्बल घटकांना कुठल्याही प्रकारचे स्वामित्वधन(रॉयल्टी) आकारले जाणार नाही.   
      यावेळी पंढरपूर नगर पालीकेचे विरोधी पक्षनेते सुधीर धोत्रे,गटनेते सुरेश नेहतराव,नगरसेवक महादेव भालेराव,प्रशांत शिंदे,राहुल साबळे,महादेव धोत्रे,निलेश आंबरे आदी उपस्थित होते.


-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 40 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com 

add