आठ तासानंतर शेतकर्‍यांच्या आंदोलनाला यश... 5 तारखेला 200 क्युसेक्स आणि 7 तारखेपासुन 300 क्युसेक्सने भाटघरचे पाणी सोडण्याचे अधिकार्‍यांचे आश्‍वासन - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Friday, 3 May 2019

आठ तासानंतर शेतकर्‍यांच्या आंदोलनाला यश... 5 तारखेला 200 क्युसेक्स आणि 7 तारखेपासुन 300 क्युसेक्सने भाटघरचे पाणी सोडण्याचे अधिकार्‍यांचे आश्‍वासनसमन्याय हक्काने भाटघरचे पाणी मिळावे या मागणीसाठी सांगोला व पंढरपूर तालुक्यातील पाचशेहुन अधिक शेतकर्‍यांनी आज सकाळपासुनच पंढरपूर पंचायत समिती समोरच्या नीरा उजवा कालवा कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरु केले होते. तब्बल आठ तासानंतर या आंदोलनाला यश मिळाले असुन येत्या 5 तारखेला 200 क्युसेक्स आणि 7 तारखेपासुन 300 क्युसेक्सने पाणी सोडणार असल्याचे आश्‍वासन नीरा उजवा कालवा फलटण विभागाचे कार्यकारी अभियंता अमोल पंडितराव निकम यांनी दिल्यानंतर हे आंदोलन स्थगीत करण्यात आले. आ. गणपतराव देशमुख यांनी स्वत:च शेतकर्‍यांमध्ये बसुन जोपर्यंत मागणी मान्य होत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरु ठेवु अशी घेतलेली भुमिका आणि पंढरीतील पत्रकारांची मध्यस्थी यामुळे या आंदोलन यशस्वी ठरले.पंढरपूर आणि सांगोला तालुक्यातील कालवा लाभक्षेत्रातील शेतकर्‍यांना मुदतीपूर्वीच पाणी संपल्याचे अधिकारी सांगत असल्याने बेमुदत धरणे आंदोलना ला सुरुवात केली होती. 39 दिवसांमध्ये 11400 क्युसेस पाणी सोडण्यासाठी मंजूर असतानाही आत्ताच हे पाणी संपले असून पाच ते सहा फाट्यामध्ये पाणी येणार नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतीसाठी, पिण्यासाठी व जनावरांसाठी पाणीच नसल्याने शेतकर्‍यांतून संताप व्यक्त होतो मात्र संबंधीतअधिकारी आणि कर्मचारी हे आमिषाला बळी पडून पाणी विकत असल्याचा आरोप काही शेतकर्‍यांनी केला. उर्वरित शेतकर्‍यांना कसे आणि कुठून पाणी देणार? हा खरा प्रश्‍न असल्याने नीरा उजवा कार्यालयासमोर सांगोला व पंढरपूर तालुक्यातील शेतकर्‍यांनी बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले होते. या आंदोलनाला आमदार प्रशांत परिचारक, माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी पाठिंबा दिला. तर आमदार गणपतराव देशमुख यांनी आंदोलनात सहभागी होऊन शेतकर्‍यांच्या पाठीशी असल्याचे सांगत जो पर्यंत पाणी मिळत नाही तोपर्यंत धरणे आंदोलन सुरु ठेवु अशी भुमिका घेतली होती.
आंदोलनादरम्यान शेतकर्‍यांच्या भावना तीव्र बनल्या होत्या. हे आंदोलन पेटतेय की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली होती; परंतु तब्बल आठ तासाच्या या आंदोलनाला अखेर यश मिळाले असुन आ. गणपतराव देशमुख यांनी अधिकार्‍यांची कानउघाडणी करत त्यांच्या चुका उघडपणे त्यांना दाखवुन दिल्या. शेतकर्‍यांच्यावरील अन्याय खपवुन घेणार नसल्याचे ठणकावुन सांगणारे आ.गणपतराव देशमुख व एवढा वेळ आंदोलन चालु असुनही तुम्ही निर्णय घ्यायला विलंब का लावता? असा पत्रकार सुनील उंबरे यांनी अधिकार्‍यांना विचारलेला प्रश्‍न यामुळे बरेच तास गप्प बसलेले कार्यकारी अभियंता अमोल निकम आणि पंढरपूर पाटबंधारेचे उपविभागीय अधिकारी माणिक देशमुख हे बोलते झाले आणि अखेर त्यांनी येत्या 5 तारखेला 200 क्युसेक्स आणि 7 तारखेपासुन 300 क्युसेक्सने पाणी सोडणार असल्याचे जाहीर आश्‍वासन दिले.


-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 40 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com 

add