पंढरपूर नगरपरिषदेच्यावतीने कामगार दिनानिमित्त आदर्श कामगार पुरस्कार प्रदान. - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Wednesday, 1 May 2019

पंढरपूर नगरपरिषदेच्यावतीने कामगार दिनानिमित्त आदर्श कामगार पुरस्कार प्रदान.पंढरपूर नगरपरिषदेच्यावतीने महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ५९ वा वर्धापन दिन, कामगार दिन व नगरविकास दिनानिमित्त आरोग्य विभागाकडील सफाई कर्मचा-यांना नगरपरिषदेच्यावतीने गुणवंत व आदर्श कामगार पुरस्कार नगराध्यक्षा सौ.साधनाताई नागेश भोसले यांच्या हस्ते, उपनगराध्यक्षा सौ.लतिका डोके यांच्या अध्यक्षतेखाली व मुख्याधिकारी अभिजीत बापट, उपमुख्याधिकारी सुनिल वाळुजकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

यावेळी सफाई कर्मचारी इंदु पाटोळे, ज्योत्सा सोलंकी, वत्सला माने, रमेश शिंदे, सुरेश लोखंडे, गौतम पाटोळे यांना आदर्श कामगार पुरस्कार प्रदान करण्यात आला.

यावेळी नगराध्यक्षा सौ.साधनाताई भोसले यांनी बोलताना सांगितले की, पंढरपूर हे तिर्थक्षेत्र असल्याने वर्षातुन भरणा-या चार मोठ्या यात्रा, दर महिन्याची एकादशी व संपुर्ण भारतातुन दररोज येणा-या भाविकांची गर्दीमुळे शहराच्या आरोग्य व्यवस्थेवर परिणाम होतो त्यामुळे शहरातील नागरीकांना व भाविकांना सेवासुविधा देत असताना सफाई कर्मचारी हा आपली सेवा प्रमाणिकपणे करत असतो. त्यामुळे आज या सफाई कर्मचा-यांना आदर्श पुरस्कार देत असताना मला मनस्वी आनंद होत आहे. सर्व कामगारांना महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी गटनेते गुरुदास अभ्यंकर, नगरसेविका शकुंतला नडगिरे, सुप्रिया डांगे, नगरसेवक विवेक परदेशी, आदित्य फत्तेपुरकर, डी.राज.सर्वगोड, माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले, सामाजिक कार्यकर्ते अमोल डोके,  आरोग्य अधिकारी डॉ.संग्राम गायकवाड, स्वच्छता निरीक्षक शरद वाघमारे, नागनाथ तोडकर, सुखदेव माने, कामगार संघटनेचे माजी अध्यक्ष भाई राजेंद्र भोसले, सर्व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.


-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 40 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com 

add