पंढरपूर नगरपरिषदेचे माजी नगरसेवक सचिन डांगे यांचे दु:खद निधन - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Monday, 13 May 2019

पंढरपूर नगरपरिषदेचे माजी नगरसेवक सचिन डांगे यांचे दु:खद निधन


पंढरपुर नगरपरिषद चे माजी पक्षनेते व माजी नगरसेवक सचिन डांगे यांचे आज सकाळी 11:30 वाजता
 हृदयविकाराने दुःखद निधन झाले.

काल रात्री त्यांंना हृदयविकाराचा त्रास होऊ लागल्याने सोलापूर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. परंतु उपचार सुरू असतानाच आज त्यांची प्राणज्योत मालवली.

सचिन डांगे हे राजकीय क्षेत्रासोबतच सामाजिक क्षेत्रातही भरीव योगदान देणारे समाजसेवक म्हणुन सुपरिचित होते. आपल्या मनमिळाऊ आणि दिलखुलास स्वभावामुळे त्यांनी खुप मोठा मित्रपरिवार मिळवला होता. अनेकांच्या मदतीला धावून जाणा-या पंढरीतील या सुपूत्राच्या आकस्मिक निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्‍चात पत्नी नगरसेविका सुप्रिया डांगे, मुलगा, मुलगी, आई-वडील व बंधु असा परिवार आहे.

आज  दुपारी 5  वाजता त्यांची अंत्ययात्रा त्यांचे राहते घरापासून निघेल.
ईश्वर आत्म्यास शांती देवो.. पंढरपूर लाईव्ह कडून त्यांच्या चिरंतन स्मृतीस भावपूर्ण श्रद्धांजली.








-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 40 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com 

add