कोळा येथील डाँ विक्रम हातेकर यांची एमडी मेडिसिन परीक्षेत यश... - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Thursday, 2 May 2019

कोळा येथील डाँ विक्रम हातेकर यांची एमडी मेडिसिन परीक्षेत यश...


आ गणपतराव देशमुख माजी आ दिपक साळुंखे पाटील यांनी अभिनंदन केले.
कोळा वार्ताहर
सांगोला तालुक्यातील कोळा येथील डॉक्टर विक्रम सत्यवान हातेकर यांनी नीट द्वार
घेण्यात आलेल्या एमडी मेडिसिन निवड परीक्षेत  देशपातळीवर गुणवत्ता यादीत स्थान पटकावले असल्याने कोळा गावात सर्व स्थरातुन अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
सर्वसामान्य कुटुंबातून शिक्षणाच्या जोरावर दोन बंधूंनी वैद्यकीय क्षेत्रातलौकिक निर्माण करण्याच्या या कामगिरी बद्दल आणि मुलांसाठी कष्ट घेणाऱ्या आई-वडिलांचे कौतुक होत आहे.
राज्य परिवहन महामंडळाच्या आटपाडी आगारात वाहतूक नियंत्रक म्हणून काम करणारे सत्यवान हातेकर सार्वजनिक क्षेत्रात लौकिक असणारे व्यक्तिमत्व आहे सामाजिक बांधिलकी जतन करत वाटचाल करणारे सत्यवान हातेकर यांनी मुलांसाठी शिक्षणासाठी कष्ट घेतले यांचे मोठे चिरंजीव खरसंडी येथे वैद्यकीय सेवा देत आहेत.


मोठ्या मुलाच्या डॉक्टरी नंतर धाकट्या  मुलाने  डॉक्टर बनावे ही सत्यवान हातेकर यांची व्हावे इच्छा होती.त्यानुसार डॉक्टर विक्रम हातेकर यांनी मुंबई येथे एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केले त्यांनी गुणवत्ता यादीत स्थान मिळवले आता नीट द्वारे परीक्षेत एमडी मेडिसिन च्या परीक्षेत डॉक्टर विक्रम हातेकर यांनी देशातील दीड लाख विद्यार्थ्यांमध्ये ठसा उमटवत पंधरा हजार  क्रमांकावर स्थान प्राप्त केले मुलाच्या डॉक्टर के साठी कष्ट घेणारे शिक्षणाला प्रोत्साहन देणारे वडील सत्यवान हातेकर आई ,भाउ,यांच्यामुळे यश मिळाले असल्याचे डाँ हातेकर यांनी सांगितले
डॉक्टर विक्रम हातेकर यांनी मिळवलेल्या यशाबद्दल आमदार गणपतराव देशमुख, माजी आमदार दिपकआबा साळुंखे-पाटील, डॉक्टर खर्जे,डाँ गायकवाड,डाँ जानकर यांनी अभिनंदन केले.डाँ विक्रम हातेकर,वाहतुक नियंञक सत्यवान हातेकर व त्यांची पत्नी यांचा गौरव सत्कार कोळा गावचे सरपंच शहाजी हातेकर,राजमाता फायनान्सचे व्हा चेअरमन राजेद्र देशमुख,मारुती हातेकर,युवक नेते कुंडलिक आलदर सर,जगन्नाथ माने सर,जगदिश कुलकर्णी,युवा नेते धनाजी सरगर,ग्रा.पं.सदस्य विजय आलदर,विजय माळी,अमोल माने,सारंग पोरे,अक्षय कोपर्डे,यांनी केला.

-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 40 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com 

add