पंढरपूर तालुक्यातील पुळूजवाडी येथील अल्पवयीन मतीमंद मुलीवर बलात्कार... पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या! - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Wednesday, 15 May 2019

पंढरपूर तालुक्यातील पुळूजवाडी येथील अल्पवयीन मतीमंद मुलीवर बलात्कार... पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या!


पंढरपूर तालुक्यातील पुळूजवाडी येथे एका अल्पवयीन मुलीवर गावातीलच एका नराधमाने पेरु खाण्याचे आमीष दाखवुन बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. संबंधीत गुन्ह्यातील वासनांध नराधम आरोपीस पोलिसांनी अटक केली असुन अधिक तपास सुरु आहे.

याबाबत पंढरपूर तालुका पोलिसांकडून समजलेल्या माहितीनुसार दि. 14 मे 2019 रोजी पळूजवाडी येथील 15 वर्षीय अल्पवयीन मतीमंद मुलीच्या घरी कोणी नसल्याची संधी साधुन गावातीलच वासनांध आरोपी आबा रामचंद्र मदने (वय-25) याने सदर मुलीस ऊसाजवळील पेरुचे झाडातील पेरु काढायला लावुन व पेरु खायला देवुन ऊसाच्या पिकात तिला घेवुन जावुन तिच्यावर जबरी संभोग केला. याबाबत संबंधीत मुलीच्या आईने पंढरपूर तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असुन संबंधीत आरोपीविरुध्द भादवि कलम  376 (2) (आय) (एल) सह बालकांचे लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये कलम 4, 6, 8, 12, 42 अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

 आरोपी पुळूजवाडी जवळ आला असल्याची माहिती मिळताच पोलीस उप निरीक्षक वसगडे, पो. ना. आर्किले, म. पो. कॉ. थोरात यांनी पाठलाग करून ऊसाचे शेतातून आरोपीला शिताफीने अटक केली आहे. अधिक तपास पोसई वसगडे हे करत आहेत.

-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 40 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com 

add