एकादशीनिमित्त पांडुरंगाच्या दर्शनासाठी येताना भाविकांच्या जीपला अपघात... बीड जिल्ह्यातील वयोवृद्ध भाविकाचा मृत्यू - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Wednesday, 15 May 2019

एकादशीनिमित्त पांडुरंगाच्या दर्शनासाठी येताना भाविकांच्या जीपला अपघात... बीड जिल्ह्यातील वयोवृद्ध भाविकाचा मृत्यू


पंढरपूर : आज एकादशीनिमित्त पांडुरंगाच्या दर्शनासाठी येताना भाविकांच्या जीपला अपघात झाला असुन या अपघातात एका वयोवृद्ध भाविकाचा मृत्यू झाला आहे.

 आज बुधवारी एकादशी निमित्ताने पंढरपूरला विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी जीपमधून निघालेल्या भाविकांची जीप गुरसाळे येथे झाडावर आदळली. या अपघातात लालाभाऊ धोंडीबा शिंदे शेरे (ता. आष्टी, जि. बीड) या वयोवृद्ध भाविकाचा मृत्यू झाला आहे.

आज  बुधवारी मोहिनी एकादशी असल्यामुळे शेरे येथील ६ भाविक विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी पंढरपूरला निघाले होते. त्यांची जीप पंढरपूर जवळील गुरसाळे जवळील शिंदे वस्ती येथे आली असता चालकाला डुलकी लागली. त्यामुळे चालकाचा जीपवरील ताबा सुटल्याने ती आदळली. या अपघातात लालाभाऊ धोंडीबा शिंदे (वय ६५) हे जागीच ठार झाले. अपघातातील जखमींवर उपचार सुरू असुन पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

पंढरपूर तालुका पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार

आज दिनांक पहाटे 03/30  वा.चे सुमारास आष्टी तालुका बीड येथून पंढरपूर एकादशी करिता येणारी स्कार्पिओ गाडी नंबर MH23Y0551 वरील चालक नामे किसन सखाराम गायकवाड  यांना झोप आल्याने झोपेमध्ये स्कार्पिओ गाडी रोडच्या रॉंग साईड ला जाऊन चिंचेच्या तोडलेल्या खोडाला धडक दिल्याने त्यामध्ये लालाभाऊ धोंडीबा शिंदे वय 65 वर्षे राहणार खाकळवाडी तालुका आष्टी जिल्हा बीड हे जागीच मयत झाले असून १) भाऊसाहेब रामभाऊ सोनवणे 2) राम नाना सोनवणे 3)सुभाष बापू नरूडे 4) किसन सखाराम गायकवाड 5)अंकुश निवृत्ती थेटे 6) बळीराम सोनबा मोरे हे जखमी झाले असून त्यांचेवर गॅलेक्सी हॉस्पिटल पंढरपूर येथे उपचार चालू आहेत.







-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 40 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com 

add