श्री विठ्ठल अभियांत्रिकीच्या २३ विद्यार्थ्यांची ‘ईपिक रिसर्च ’ कंपनीत इंटरव्युवद्वारे निवड


पंढरपूरः- ईपिक रिसर्च’ या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कंपनीने घेतलेल्या मुलाखतीत श्री विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयातील तब्बल २३ विद्यार्थ्यांची कॅम्पस इंटरव्युवद्वारे निवड करण्यात आली असून प्रत्येक वर्षीच्या तुलनेत यंदा निवड होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत आणखी भर पडत आहे.’ अशी माहिती संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे यांनी दिली.
        इंदोरमध्ये असलेल्या आय. टी.व फायनान्स क्षेत्राशी निगडीत असलेल्या ईपिक रिसर्च’ या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कंपनीचे प्रमुख एच आर. सर्वेश उर्ध्वरेशे व हरीश कोल्हे व त्यांच्या निवड समितीने गोपाळपूर येथील इंजिनिअरिंग कॉलेजमधील विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या. मुलाखतीतून विद्यार्थ्यांच्या गुणात्मक अभ्यासाबरोबरच कमालीची शिस्त व उत्कृष्ट शिक्षण पध्दती यामुळे निवड समिती अत्यंत प्रभावित झाली. त्यांनी या निवड प्रक्रियेच्या अंतिम फेरीतून इंजिनीअरिंगच्या अंतिम वर्षात शिक्षण घेणारे सिव्हील इंजिनिअरिंगचे पूजा इतकपल्ली व सारिका जाधव या दोघी, कॉम्प्यूटर सायन्स अँन्ड इंजिनिअरिंगचे प्रिया जाधव, शरयू कांबळे, दीक्षा यारगट्टीकर, पृथ्वीराज पवार, संजीवनी पवार, अजिंक्य घोडके, सायली रणवरे,जयश्री देवकुळे, पूजा ढेकणे, सैफ तांबोळी, दिपन्विता देब असे आकरा जण , इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगचे प्रतीक्षा गायकवाड, सायली जोशी, अमृता रजपूत, निकिता सुतार, शुभांगी शिंनगारे व दिपाली दंडवते हे सहा जण तर मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे गुरुप्रसाद बडवे, प्रथमेश म्हमाणे, अशोक मुळे व बालाजी सुरवसे हे चौघेजण असे मिळून एकूण तेवीस विद्यार्थ्यांची ईपिक रिसर्च’ या कंपनीसाठी निवड झाली आहे.श्री विठ्ठल अभियांत्रिकीमध्ये कॅम्पस प्लेसमेंटचे प्रमाण अधिक तीव्रगतीने वाढत असून दररोज नवनवीन व आंतरराष्ट्रीय कंपन्या स्वेरीत येतात आणि कंपनीसाठी पात्र असे विद्यार्थ्यांची निवड करतात. त्यामुळे विविध आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये येथील विद्यार्थी स्थिर होवून आपले उत्तम करिअर घडवीत आहेत. कंपनीला कशा प्रकारचे विद्यार्थी हवे असतात.याचा सखोल अभ्यास करून मागणी तसा पुरवठाया तत्वाप्रमाणे संबधित प्रशिक्षण विद्यार्थ्यांना विशेष प्रशिक्षकांद्वारे दिले जाते. सदर विद्यार्थ्यांना ट्रेनिंग अॅण्ड प्लेसमेंट विभागाचे अधिष्ठाता डॉ.माधव राऊळ व प्रा.एस.व्ही.दर्शने आदी प्राध्यापकांचे बहूमोल मार्गदर्शन लाभले आहे. विद्यार्थ्यांच्या निवडीमुळे शिक्षण पूर्ण होण्यापूर्वीच नोकरीची संधी उपलब्ध झाल्यामुळे विषेशतः पालक वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे. संस्थेचे संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगेसंस्थेचे अध्यक्ष प्रा.सी.बी.नाडगौडा तसेच संस्थेचे पदाधिकारी व विश्वस्त, स्वेरी अंतर्गत असलेल्या महाविद्यालयांचे प्राचार्य, उपप्राचार्य, विभागप्रमुख अनुक्रमे डॉ. प्रशांत पवार, डॉ.निखील कारंडे, डॉ. अनुप विभूते, प्रा. एस. आर. गवळी, इतर अधिष्ठाताप्राध्यापक वर्गशिक्षकेतर कर्मचारी यांच्यासह पालकांनी कॅम्पस इंटरव्युवमधून निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.  

-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 40 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com