खर्डी येथील युवकाचे उदनवाडी जवळ अपघाती निधन... स्वत:च्या मुलाचे नाव ठेवण्याच्या कार्यक्रमास येताना राहुलचा अपघाती मृत्यू झाल्यामुळे खर्डी परिसरात हळहळ - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Friday, 3 May 2019

खर्डी येथील युवकाचे उदनवाडी जवळ अपघाती निधन... स्वत:च्या मुलाचे नाव ठेवण्याच्या कार्यक्रमास येताना राहुलचा अपघाती मृत्यू झाल्यामुळे खर्डी परिसरात हळहळ खर्डी :खर्डी येथील राहुल बाळासाहेब कांबळे वय वर्ष अंदाजे ( 27 ) हा युवक
स्वत:च्या मुलाचे  नाव ठेवण्यासाठी सुट्टी काढून इचलकरंजी येथुन आपल्या राहत्या गावी खर्डी ता.पंढरपूर ला येत असताना उदनवाडी स्टॉप जवळ भरधाव वेगाने येणाऱ्या आयशर टॅम्पोने त्याला उडवले यामध्ये राहुल बाळासाहेब कांबळे याचे जागीच निधन झाले.

राहुल इचलकरंजी येथील खाजगी कंपनीत नौकरी करत होता.

 निधनाची वार्ता समजताच सांगोला पोलीस स्टेशनचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले व शवविच्छेदनासाठी सांगोला ग्रामीण रुग्णालयांमध्ये तातडीने आणण्यात आले. सदर घटनेची माहिती खर्डी गावामध्ये समजताच सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. राहुलच्या पश्चात आई वडील भाऊ पत्नी व दोन महिन्यांचा मुलगा असा परिवार आहे. गेल्याच वर्षी मे महिन्यामध्ये राहुल चे लग्न झाले होते राहुलच्या निधनाने संपुर्ण खर्डी गावावर शोककळा पसरली आहे.


-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 40 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com 

add