सांगोला तालुक्यातील कारंडेवाडी-बुध्देहाळ तलाठी कार्यालयातील खुन प्रकरणी आरोपींना पोलिस कोठडी - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Wednesday, 15 May 2019

सांगोला तालुक्यातील कारंडेवाडी-बुध्देहाळ तलाठी कार्यालयातील खुन प्रकरणी आरोपींना पोलिस कोठडी


सांगोला तालुक्यातील कारंडेवाडी बुध्देहाळ येथील तलाठी कार्यालयात झालेल्या खुनप्रकरणातील आरोपींना आज दि. 15 मे 2019 रोजी सांगोला येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांनी पोलिस कोठडी सुनावली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, दि. 14 मे 2019 रोजी तलाठी कार्यालय कारंडेवाडी बुध्देहाळ, ता.सांगोला येथे रात्री 9 वाजणेचे सुमारास अशोक अंबाजी कारंडे व  सुरेश कारंडे (रा.कारंडेवाडी बुध्देहाळ) हे दोघे कागदपत्रे (सातबारा उतारे) वगैरे आणण्यासाठी गेले होते. याचवेळी सुर्यकांत जयवंत लवटे व त्यांचा भाऊ चंद्रकांत जयवंत लवटे हेही येथे कागदपत्रे (सातबारा उतारे) वगैरे आणण्यासाठी गेले होते. तेथे कारंडे व लवटे यांच्यामध्ये कार्यालयातील कागदपत्रे आदी मिळवण्यावरुन झालेल्या वादाचे रुपांतर मारामारीमध्ये झाले. त्यात अशोक अंबाजी कारंडे याचे डोक्यात विळ्याने वार झाल्याने तो गंभीर जखमी झाला. तर सदरच्या घटनेमध्ये भांडण सोडविण्यासाठी गेलेले महादेव कोळेकर (ज्यांचा झालेल्या वादाशी काहीही संबंध नाही.) यांचा सिमेंटच्या रस्त्यावर पडून डोक्यात मार लागल्याने मृत्यु झाला.सदर प्रकरणात सुरेश बारकु कारंडे, अशोक कारंडे, लक्ष्मण शिवाजी कारंडे व इतर दोघांविरुध्द भारतीय दंड संहीता 302, 307, 143, 147 इत्यादी अन्वये गुन्हा दाखल झाला आहे. तर सुर्यकांत जययवंत लवटे व चंद्रकांत जयवंत लवटे यांच्याविरुध्द भारतीय दंड संहिता 324, 323, 504, 506 सह 34 अन्वये गुन्हा दाखल झाला आहे. सदरचे गुन्हे हे परस्परविरोधी तक्रारीने दाखल झालेले आहेत.

सदर प्रकरणी यातील अशोक अंबाजी कारंडे, सुरेश कारंडे, लक्ष्मण शिवाजी कारंडे, व इतर एक यांना सांगोला येथील मे. कोर्टात हजर केले असताना न्यायाधिशांनी या सर्वांना 20  मे 2019 पर्यंत पोलिस कोठडी सुनावली .  यात आरोपी कारंडे यांचेतर्फे  त्यांचे वकील अ‍ॅड.शशी कुलकर्णी, अ‍ॅड. ओंकार बुरकुल यांनी फिर्याद जर का पाहिली असता आरोपींना खोट्या गुन्ह्यामध्ये गुंतविण्यात येत आहे. पोलिसांना तपासासाठी योग्य तो परिपुर्ण कालावधी मिळालेला आहे. त्यामुळे आरोपींना पोलिस रिमांडची आवश्यकता नाही. अशा व इत्यादी स्वरुपाचा युक्तीवाद केला. तर सरकारी वकील श्री.ढवळे यांनी गुन्हा हा गंभीर स्वरुपाचा आहे, अशा व इत्यादी स्वरुपाचा युक्तीवाद केला. सदर प्रकरणी आरोपीतर्फे अ‍ॅड.शशी कुलकर्णी, अ‍ॅड. ओंकार बुरकुल, अ‍ॅड.कट्टे (पुणे) यांनी काम पाहिले. सरकारतर्फे सरकारी वकील ढवळे काम पहात आहेत. पुढील तपास सांगोला पोलिस ठाणे मार्फत सुरु आहे.


-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 40 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com 

add