मोदी सरकारमधील मंत्र्यांच्या प्रवासांवर ५ वर्षांत ३९३ कोटीचा खर्च - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Saturday, 11 May 2019

मोदी सरकारमधील मंत्र्यांच्या प्रवासांवर ५ वर्षांत ३९३ कोटीचा खर्च


मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारमधील मंत्री आणि राज्यमंत्र्यांनी मागील ५ वर्षात मोठया प्रमाणात परदेशी आणि देशातंर्गत प्रवास केला असून या प्रवासावर एकूण ३९३ कोटी ५७ लाख ५१ हजार ८९० रुपये खर्च झाल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांना कॅबिनेट अफेअर्सच्या वेतन आणि खाते विभागाने दिली आहे. सर्वाधिक खर्च परदेशी प्रवासांवर झाला असून त्यावर खर्च झालेली रक्कम २९२ कोटी आहे तर देशातंर्गत प्रवासांवर ११० कोटी रुपयांचा खर्च झालेला आहे.


अनिल गलगली यांनी पंतप्रधान मोदी यांच्यासह सर्व मंत्री आणि राज्यमंत्र्यांनी गेल्या ५ वर्षात परदेशी आणि देशातंर्गत प्रवासांवर झालेल्या एकूण खर्चाची माहिती मागितली होती. कॅबिनेट अफेअर्सच्या वेतन आणि खाते विभागाचे वरिष्ठ लेखा अधिकारी सतीश गोयल यांनी ई- लेखाच्या आधारावर त्या कार्यालयाच्या अभिलेखावर उपलब्ध वर्ष २०१४- २०१५ पासून वर्ष २०१८-२०१९ या ५ वर्षात परदेशी आणि देशातंर्गत प्रवासांवर झालेल्या एकूण खर्चाची आकडेवारी दिली. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी सह कॅबिनेट आणि राज्यमंत्र्यांच्या नावाचा उल्लेख नाही.


गेल्या 5 वर्षात कॅबिनेट मंत्र्यांच्या परदेश प्रवासांवर एकूण २६२ कोटी ८३ लाख १० हजार ६८५ रुपये खर्च करण्यात आले तर देशातंर्गत प्रवासावर एकूण ४८ कोटी ५३ लाख ९ हजार ५८४ रुपये खर्च झाले. राज्यमंत्र्यांच्या परदेश प्रवासावर २९ कोटी १२ लाख ५ हजार १७० रुपये खर्च करण्यात आले तर देशातंर्गत प्रवासांवर ५३ कोटी ९ लाख २६ हजार ४५१ रुपये खर्च झाले आहेत.
मोदी सरकारच्या काळात मंत्र्यांचा परदेश आणि देशातंर्गत प्रवास मोठ्या प्रमाणात झाला असून एकूण खर्चाची माहिती अभिलेखावर आहे पण कोणत्या मंत्र्यांनी आणि राज्यमंत्र्यांनी किती प्रवास केला आहे त्याचे विवरण देण्याचा प्रयत्न करण्यात आला नाही. याचे विवरण केंद्र शासनाने सार्वजनिक केले पाहिजे, असे मत अनिल गलगली यांनी व्यक्त केले.-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 40 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com 

add