२८ मे रोजी डॉ. बी.डी.जत्ती बी.एड.महाविद्यालयच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Wednesday, 15 May 2019

२८ मे रोजी डॉ. बी.डी.जत्ती बी.एड.महाविद्यालयच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा


पंढरपूर- दक्षिण भारत हिंदी प्रचार सभा, मद्रास संचलित डॉ. बी.डी.जत्ती बी.एड. महाविद्यालय, बिजापूर मधील सन १९९६-९७ मधील विद्यार्थ्यांचा येत्या २८ मे २०१९ रोजी पाकणी (जि.सोलापूर) मध्ये ‘माजी विद्यार्थी मेळावा’ आयोजित केल्याची माहिती विद्यार्थी प्रमुख सुनिल साठे यांनी दिली.
       बिजापूर (कर्नाटक) मधील अफजलपुर टक्के येथील डॉ. बी.डी.जत्ती बी.एड. महाविद्यालयातील सन १९९६-९७ बॅचमधील विद्यार्थ्यांचा येत्या २८ मे (मंगळवार) रोजी सोलापूर-मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील पाकणी येथील ‘अभिषेक मळा’ या नयनरम्य ठिकाणी आयोजित केले असून याची तयारी अंतिम टप्यात आली असल्याची साठे यांनी सांगितले.  मेळाव्याच्या निमित्ताने भारतभर विखुरलेले बी.एड.चे माजी विद्यार्थी एकत्रित येणार आहेत. सकाळी १० ते सायंकाळी ६ पर्यंत हा मेळावा घेण्यात येणार असून यावेळी महाविद्यालयीन आठवणींना उजाळा  मिळणार आहे.  सोशल मीडियामुळे अनेक मित्र संपर्कात आले असून यापूर्वी मागील वर्षी मेळावा घेण्यात आला होता. जुने मित्र मिळाल्यामुळे सर्वजण उत्साहीत आहेत. तरी  सन १९९६-९७ मध्ये बिजापूर येथील बी.एड. बॅचमधील राज्यातील विविध जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी सुनिल साठे (९९२२८६०४२६), निसार कडेगावकर (९८२२४१३९८६), श्रीदेवी राठोड (९८८००५८४६१) व जगन्नाथ राजमाने (९४२१०८८८८२) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.







-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 40 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com 

add