लोट्सच्या डॉ. जयश्री चव्हाण यांना ‘जिल्ह्यातील उत्कृष्ठ प्राचार्या’ म्हणून सन्मानित सायन्स ऑलंपियाड फौंडेशन तर्फे जागतिक पातळीवर मिळाला पुरस्कार


पंढरपूर- हरियाणा राज्यातील गुरगाव येथील जागतिक पातळीवरील सायन्स ऑलंपियाड फौंडेशनतर्फे जवळ जवळ पन्नास हजार स्कूलमधून प्रामुख्याने तीस देशातील चौदाशे शहरातून ऑलंपियाड ही स्पर्धा परीक्षा प्रत्येक वर्षी आयोजित केली जाते.
       कासेगाव (ता. पंढरपूर) येथील श्री विठ्ठल इन्स्टिट्यूट ऑफ प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन (स्वाईप) संचलित लोट्स इंग्लिश स्कुलमधील विद्यार्थ्यांनी उत्तुंग यश मिळवत सुवर्ण, रौप्य आणि कास्य असे मिळून तब्ब विविध विषयांमध्ये ९५ पदकांची प्राप्ती केली. तसेच झोनल स्तरावर सहा पदके मिळवत स्कॉलरशिप मिळविली आहे. कुशल नेतृत्व, शैक्षणिक क्षेत्रातील भव्य योगदान, स्कूलची वाढती शैक्षणिक गुणवत्ता यामुळे मिळालेले यश आणि नाविन्यता या लक्षवेधी कारणांमुळे सायन्स ऑलंपियाड फौंडेशन यांच्याकडून लोट्सच्या प्राचार्या डॉ. जयश्री वामनराव चव्हाण यांना ‘एस.ओ.एफ. बेस्ट डीस्ट्रीक्ट प्रिन्सिपॉल अवार्ड -२०१८-१९’ म्हणून नुकतेच सन्मानित सन्मानित करण्यात आले.


प्राचार्या व विद्यार्थ्यांनी केलेल्या या कामगीरीबद्धल सर्वत्र कौतुक होत असून असेच यश प्राचार्या व विद्यार्थ्यांनी मिळवत राहो अशी अपेक्षा सर्व स्तरातून व्यक्त केली जात आहे. प्राचार्या डॉ. जयश्री चव्हाण यांनी गेल्या आठ वर्षापासून ‘लोट्स’मध्ये कार्यरत असून सात वर्षापूर्वी त्यांनी पीएचडी अभ्यासक्रमाची पदवी संपादन केली. त्यांनी कौटुंबिक जबाबदारी सांभाळून शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासात गोडी व शिस्त लावण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असतात तर विद्यार्थ्यांच्या विकासासाठी विविध उपक्रम राबवितात. यामुळे विद्यार्थी अभ्यासात रुची निर्माण करून गुणवत्ता सतत वाढविताना दिसून येते. त्यामुळेच लोट्सचे विद्यार्थी सध्याच्या स्पर्धेच्या युगासाठी पात्र असतात. सदर यशाबद्धल प्राचार्या डॉ. जयश्री चव्हाण व  विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दादासाहेब रोंगे यांच्या हस्ते प्राचार्या डॉ. जयश्री चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला. संस्थेचे संस्थापक सचिव डॉ. बी.पी.रोंगे यांच्या दिशादर्शक मार्गदर्शनाखाली अध्यक्ष बी.डी. रोंगे, उपाध्यक्ष एच. एम. बागल, संस्थेचे इतर पदाधिकारी व विश्वस्त तसेच संस्थेच्या अंतर्गत असलेल्या महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी  यांनी देखील अभिनंदन केले.

-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 40 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com