स्वेरीचं तुफान आलंया... डोंगरगावात ‘पाणी फाऊंडेशन’ उपक्रमात स्वेरीचे भव्य योगदान - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Tuesday, 7 May 2019

स्वेरीचं तुफान आलंया... डोंगरगावात ‘पाणी फाऊंडेशन’ उपक्रमात स्वेरीचे भव्य योगदान


डोंगरगाव (ता. मंगळवेढा)मध्ये स्वेरी परिवाराने पाणी फाऊंडेशन च्या निमित्तने श्रमदान करून योगदान दिले. यावेळी श्रमदान करताना मंगळवेढ्याच्या नगराध्यक्षा सौ अरुणा माळी, मंगळवेढा अर्बन बँकेचे चेअरमन राहुल शहा, दामाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. बी. पवार सोबत स्वेरीचे प्राध्यापक वर्ग.  (छायाचित्र- अमोल चंदनशिवे)

पंढरपूर (संतोष हलकुडे)- सकाळी साधारण ७ ची वेळ असावी डोंगरगाव (ता. मंगळवेढा) मध्ये पिवळ्या रंगाची मोठी लांबलचक  स्कूल बस येवून उभी राहिली तर काही स्टाफ दुचाकीवरून आले. कोणी कोणाला काहीही न बोलता स्कूल बसमधून  पटापट उतरून सोबत आणलेल्या पाट्याकुदळखोऱ्या उचलल्या आणि समोर दिलेल्या जागेत आपले काम सुरु केले आणि हा हा म्हणता तब्बल सात तासात सर्व मिळून साधारण १२० फुट अंतर खांदुन पाणी साठविण्यासाठी खड्डे करत होते. काहीजण दमल्यावर पाण्याचा घोट घ्यायचे आणि पुन्हा जोमाने कामाला लागायचे! डोंगरगावातील काबाडकष्ठ करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी हा आल्हाददायक नजारा होता! ज्या हाताची बोटे खडूने पांढरी व्हायची आज त्याच हातात शेतकी अवजारे होती आणि संपूर्ण शरीर घामाने माखून त्यावर शेतातील काळ्या-तांबड्या मातीचे आवरण चढले होते. त्यामुळे डोंगरगाव करांनी आज श्रमदानाचा आगळा-वेगळा अनुभव घेतला.त्याचे काय झाले. डोंगरगाव हे गाव राज्यभर राबवत असलेल्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत उतरले असून त्या दृष्टीने तयारी देखील सुरु आहे. डोंगरगावचे सरपंच बाळासाहेब कवाळे व तेथील युवा कार्यकर्ते यांनी तुफान आलंया...’ कार्यक्रमाच्या माध्यमातून पाणी फाऊंडेशन उपक्रमासाठी श्रमदान करण्यासाठी स्वेरीला काही विद्यार्थ्यांची मागणी केली होती. परंतु अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा सुरु आहे. कार्यक्रम तर समाजोपयोगी आहे. पण विद्यार्थी देता येणार नाही परंतु त्यांच्या ऐवजी प्राध्यापक वर्गांनी श्रमदानात सहभाग घेण्याची तयारी दर्शविली. स्वेरीच्या प्राध्यापकांनी स्वतः कुदळ हातात घेवून घाम गाळू लागले. स्वेरीच्या इंजीनिअरिंग व फार्मसीच्या स्टाफ समवेत पाणी फाऊंडेशनचे पदाधिकारी, राष्ट्रीय सेवा योजनेचे तसेच मेसाचे समन्वयक तसेच अधिष्ठाताविभागप्रमुखप्राध्यापकवर्ग व शिक्षकेतर कर्मचारी असे मिळून स्वेरीच्या जवळपास पन्नास प्राध्यापकांनी यात सहभाग घेतला आणि पाहता पाहता पाणी साठविण्यासाठी चारी खणली. यावेळी उन्हाचा तडाका प्रचंड जाणवत होता. परंतु स्तुत्य उपक्रमापुढे हे ऊन तर काहीच नव्हते.अखेर दिवसभर मोकळ्या रानात उन्हाच्या साथीने घाम पुसत काम फत्ते करून स्वेरीचा स्टाफ परतला. यावेळी स्वेरीने केलेल्या श्रम परिहाराचि चर्चा डोंगरगावसह संपूर्ण पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यात ऐकू येत होती. सांघिक कार्यामुळे  दिवसभरात केलेली स्वच्छता आणि साधारण  सर्व मिळून १२० फुट लांबीचेतीन फुट रुंदी आणि तीन फुट खोली असलेली एल आकाराची शेतजमीन खणलेली पाहून उपस्थित नागरिक आश्चर्य व्यक्त करत होते. 


माती काढून बांध घालताना तेथील ग्रामस्थांनी ‘आण्णा गुडगुडेनाड गुडगुडे..., ‘दुष्काळ.,ढिशक्यांव...ढिशक्यांव ....’ अशा प्रेरणादायी घोषणांमुळे कामातील उत्साह वाढत होता. स्वेरी शिक्षण संकुल महाराष्ट्रात शिक्षणातच अग्रेसर असल्याचे माहित होते. पण आता या व अशा सांघिक सामाजिक कार्यामुळे समाज कार्यात देखील ते मागे नाही हेच दिसून आले.पाणी फाऊंडेशनच्या या श्रमदानाच्या उपक्रमात मंगळवेढ्याच्या नगराध्यक्षा सौ अरुणा माळी, मंगळवेढा अर्बन बँकेचे चेअरमन राहुल शहा, दामाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. बी. पवार, डोंगरगावचे सरपंच बाळासाहेब कवाळे, सौ.कांचन कवाळे यांच्यासह स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिष्ठाता, विभागप्रमुख व प्राध्यापकांनी सहभाग घेतला. कामातील जोश पाहून सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा’ आपल्याच गावाला मिळेल अशी आशा बाळगून ग्रामस्थ देखील तेवढ्याच जोमाने श्रमदान करत आहेत. सायंकाळी डोंगरगाव ग्रामस्थांनी स्वेरी परिवाराचे आभार मानले.

-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 40 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com  

add