पंढरपूर सिंहगडच्या ६ विद्यार्थ्यांची महाबळ इंडस्ट्रीज मध्ये निवड - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Thursday, 13 June 2019

पंढरपूर सिंहगडच्या ६ विद्यार्थ्यांची महाबळ इंडस्ट्रीज मध्ये निवड



    पंढरपूर (प्रतिनिधी) जगभरातील मोठ्या ऑटोमोबाईल कंपन्यांनसाठी आघाडीच्या श्रेणीतील ऑटोमोबाईल घटक उत्पादनात अग्रेसर असणा-या महाबळ इंडस्ट्रीज-मिरज मधिल कंपनी मध्ये कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयातील ६ विद्यार्थ्यांची कॅम्पस ड्राईव्ह मधुन निवड झाली असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
     सोलापूर जिल्ह्यात अभियांत्रिकी शिक्षणाचा उत्तम दर्जा व विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देत असलेले पंढरपुर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाने अल्पावधीतच शैक्षणिक क्षेत्रात भरीव कामगिरी केली असून या महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना जगातील नामांकित कंपनीत नोक-या देऊन प्लेसमेंट मध्ये उज्ज्वल यश संपादन केले आहे.  एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग कोर्टी-पंढरपूर महाविद्यालयातील विद्यार्थ्याकडे कंपनीत आवश्यक असलेले सर्व गुण असल्यामुळे पंढरपूर सिंहगड मधिल विद्यार्थ्याची मोठ्या प्रमाणात निवड होत असल्यामुळे पालकांतून समाधान व्यक्त होत आहे. भारतात स्थापित महाबळ इन्फ्रा इंजिनियरिंग प्रा. लि. ही एक कंपनी असून ती एक विस्तृत अभियांत्रिकी कार्ये पार पाडण्यासाठी सुसज्ज आहे.


 पंढरपूर सिंहगड महाविद्यालयातील मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील शेवटच्या वर्षात अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असलेल्या अतुल खाडे, महेश चवरे, अरिफ शेख, दिगंबर शिंदे, राणी चौधरी आणि स्नेहल पवार अशा एकूण ६ विद्यार्थ्यांची महाबळ इंडस्ट्रीज मध्ये कॅम्पस ड्राईव्ह मधुन निवड करण्यात आली आहे. या कंपनीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे सर्वञ अभिनंदन होत आहे.
        महाबळ इंडस्ट्रीज मध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडेट्रेनिंग अॅड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. राजश्री बाडगेडॉ. चेतन पिसेडॉ. रविंद्र व्यवहारेप्रा. सुभाष पिंगळेप्रा. श्रीनिवास गंजेवारप्रा.अल्ताफ मुलाणीप्रा. अनिल निकमप्रा. सोमनाथ कोळीप्रा.अमोल क्षीरसागरप्रा. दिपक कोष्टीप्रा. सुर्यकांत पाटीलप्रा. अमित भादुले आदी सह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचा-यांनी अभिनंदन केले.







-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 40 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com 

add