जगदीश तिवाडी यांचे दु:खद निधन... उद्या उठावना - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Thursday, 13 June 2019

जगदीश तिवाडी यांचे दु:खद निधन... उद्या उठावना


गोपाळपूर, ता. पंढरपूर येथील सुप्रसिध्द भारुडसम्राज्ञी चंदाताई तिवाडी यांचे पती जगदीश तिवाडी (वय 74) यांचे बुधवारदि. 12 जुन रोजी सकाळी 7 वाजता अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले. त्यांच्या पश्‍चात पत्नी भारुडसम्राज्ञी चंदाताई तिवाडी, विष्णु तिवाडी , शेखर तिवाडी ही 2 मुले, संध्या साकी (मुलगी) व सुना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनामळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. येथील वैकुंठ स्मशान भुमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.


जगदीश तिवाडी हे अत्यंत मनमिळावु व्यक्तीमत्व होते. 15 जानेवारी 1947 रोजी स्वातंत्र्यपुर्व काळात त्यांचा जन्म सोलापूर येथे झाला. त्यांचा विवाह चंदाताई जयनारायण जोशी (रामभरोसे) यांचेसोबत झाल्यानंतर कांही वर्षानंतर ते पंढरपूरमध्ये स्थायीक झाले. 35 वर्ष त्यांनी खाजगी नोकरी केली. आपल्या हयातीत त्यांनी खुप मोठा मित्रपरिवार मिळवला . भारुडसम्राज्ञी चंदाताईंना ते सतत प्रेरणा देत असत. ताईंच्या यशात त्यांचा सिंहाचा वाटा होता.

 उद्या दि. 14 जुन 2019 रोजी सायंकाळी 5 वाजता राहते घरी त्यांचा उठावना आहे. त्यांच्या अस्थिकलशाचे विसर्जन हरिद्वार येथे करण्यात येणार आहे.







-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 40 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com 

add