पंढरपूर: पत्नीसोबत अनैतिक संबंध जुळवुन दे म्हणत वाद घालुन भावाचा खुन करणा-या आरोपीला दोन दिवसांची पोलीस कस्टडी - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Thursday, 6 June 2019

पंढरपूर: पत्नीसोबत अनैतिक संबंध जुळवुन दे म्हणत वाद घालुन भावाचा खुन करणा-या आरोपीला दोन दिवसांची पोलीस कस्टडी





सख्ख्या भावाच्या  खुनांमधील  आरोपीला  दोन दिवस  पोलिस कस्टडी मंजूर ......
पंढरपूर शहर गु.र.न.९७३/२०१९ भादवि कलम 302 323 इत्यादी प्रमाणे

पंढरपूर येथील संभाजी चौकातील सचिन माळवदकर याने स्वतः च्या सख्ख्या भावाला त्याच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध जुळवून दे म्हणून वाद केला. या वादातून सख्ख्या भावाचा आरोपी सचिन माळवदकर यांनी टॉवेलने गळा आवळून खून केला आहे. याप्रकरणी पंढरपूर शहर पोलिसांनी आरोपी सचिन माळवदकर याला पंढरपूर येथील ज्युडिशिअल मॅजिस्ट्रेट न्यायालय यांच्याकडे हजर केले असता पोलिसांनी तीन दिवसाची पोलिस कस्टडी रिमांड मागितले होती. 
 आरोपीच्या वतीने अ‍ॅड.किर्तीपाल सुनिल सर्वगोड व अ‍ॅड.सागर दत्तात्रय आटकळे यांनी युक्तिवाद करून आरोपीला पोलिस कस्टडीची गरज नाही, त्याला मॅजिस्ट्रेट कस्टडी देण्यात यावी. अशी मागणी केली होती परंतु पंढरपूर येथील मेहरबान न्यायालयाने आरोपीला दोन दिवसाची पोलिस कस्टडी रिमांड दिनांक ८/६/२०१९ रोजी पर्यंत देण्यात आली आहे.






-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 40 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com 

add