स्वेरीच्या डी फार्मसीमध्ये ऑनलाईन रजिस्ट्रेशन प्रक्रियेला प्रचंड प्रतिसाद - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Monday, 10 June 2019

स्वेरीच्या डी फार्मसीमध्ये ऑनलाईन रजिस्ट्रेशन प्रक्रियेला प्रचंड प्रतिसाद


पंढरपूरः- गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित डी. फार्मसीच्या प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रियेसाठी फॅसिलिटेशन सेंटर (एफ.सी.)क्र.- ६५०५ ची मान्यता मिळाली असून  सोमवार (दि ०३  जून २०१९ ) पासून ऑनलाईन प्रवेश अर्ज भरणे,कागदपत्रे पडताळणी,छाननी व नोंदणी आदी प्रक्रिया सुरू झाली असून ही प्रक्रिया बुधवार , दि. १९ जून २०१९ पर्यंत चालणार असून या रजिस्ट्रेशन प्रक्रियेस प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याची माहिती प्राचार्य प्रा. सतीश मांडवे यांनी दिली. 


      डी. फार्मसी सन २०१९-२० करीता प्रवेशासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणे,भरलेले अर्ज स्विकारुन प्रमाणपत्रे, कागदपत्रांची तपासणी,छाननी व नोंदणी आदी प्रक्रिया करण्याकरिता मुंबई  येथील मा. संचालक, तंत्र शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य (डी.टी.ई) यांचे अधिकृत केंद्र (एफ.सी. क्र.-६५०५)म्हणून मान्यता दिली आहे. पंढरपूर पंचक्रोशीतील व ग्रामीण भागातील विद्यार्थी व पालक यांच्यासाठी प्रथम वर्ष डी. फार्मसी प्रवेश प्रक्रियेचे मार्गदर्शन,पालकांचा होणारा संभ्रम,संबंधीत कागदपत्रे जमविताना होणारी अडचण व शंका याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी सुविधा केंद्र सुरु केले असून यंदाचे हे डी. फार्मसीचे १४ वे वर्ष असून उज्ज्वल यशाची पंरपंरा कायम राखली आहे. प्रथम वर्ष डी.फार्मसी प्रवेशाकरिता बारावी सायन्स  परिक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. ही प्रकिया ०३ जून २०१९  पासून ते १९ जुलै २०१९ सायं ५ वाजेपर्यंत चालणार  आहे. याचा लाभ बारावी सायन्स मधून उत्तीर्ण विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी घेण्याचे आवाहन केले आहे. या कालावधीत पडताळणी, छाननी व नोंदणी आदी प्रक्रियेनंतर मुख्य कॅप राऊंडसाठी ऑप्शन फॉर्म भरण्याची ऑनलाईन प्रक्रिया चालू होणार आहे. डी. फार्मसी प्रवेशासंबंधी अधिक माहिती साठी मोबा.क्र ९९२१७६२७२८ व टोल फ्री क्र.१८०० ३००० ४१३१ यावर संपर्क साधण्याचे आवाहन प्राचार्य प्रा. मांडवे यांनी केले आहे. स्वेरीचे संस्थापक सचिव डॉ.बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली फॅसिलिटेशन सेंटर मध्ये सर्व यंत्रणा सज्ज असल्याचे दिसून येत आहे. 






-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 40 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com 

add