झाडांचे संवर्धन करा- सहकार मंत्री देशमुख - Pandharpur Live

Breaking

Post Top Ad

Thursday, 25 July 2019

झाडांचे संवर्धन करा- सहकार मंत्री देशमुख


[[  पंढरपूर, दि. 25 :-   झाड लावाही आणि ते जगवा. कारण झाडे लावणे सोपे आहे. पण ते जगवणे, त्याचे संवर्धन करणे कष्टाचे आहे. त्यामुळे झाडांचे संवर्धन करण्यासाठी प्रयत्न करा, असे आवाहन सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी आज येथे केले.



सामाजिक वनीकरण विभाग आणि सोलापूर सोशल फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने पंढरपूर तालुक्यातील चिंचणी येथे आज रोपवाटिका, रोप लावण आणि संवर्धन याबाबत कार्यशाळा झाली. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी गावचे सरपंच कुलदीप कौलगे, सौ. स्मिता सुभाष देशमुख, सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष कल्याणराव काळे, राजकुमार पाटील, विद्याधर गावडे, विभागीय वनाधिकारी सुवर्णा माने, मोहन अनपट आदी उपस्थित होते.


 देशमुख म्हणाले, सोलापूर दुष्काळी जिल्हा म्हणून ओळखला जातो. पण जास्तीत जास्त झाडे लावून ही परिस्थिती बदलली जाऊ शकते. त्यासाठी झाडे लावली पाहिजे, त्यांचे संवर्धन करायला हवे.
मोहन अनपट यांनी चिंचणी गावात विविध प्रकारच्या झाडांचे यशस्वीरित्या संवर्धन करण्यात आले आहे. यामुळे चिंचणीत पर्यावरण चांगले आहे. चिंचणी प्रमाणे अनेक गावात झाडांचे संवर्धन होण्याची गरज आहे, असे सांगितले.




सौ. माने यांनी रोपांची निर्मिती, रोप लावण, त्याची जपणूक या सर्व बाबी शास्त्रीय पद्धतीने करायला हवे, असे सांगितले.
दिवसभर चाललेल्या या कार्यशाळेत १५३ जणांनी सहभाग नोंदवला होता. रोप लावण्याबरोबरच रोपांचे संवर्धन, जपणूक कशी करावी याबाबत प्रशिक्षण देण्यात आले.

-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 45 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com 

No comments:

Post a Comment

Pages