पालखी मार्गाच्या रस्ता रूंदीकरणासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून 51 कोटी रूपये मंजूर -आमदार प्रशांत परिचारक - Pandharpur Live

Breaking

Post Top Ad

Saturday, 20 July 2019

पालखी मार्गाच्या रस्ता रूंदीकरणासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून 51 कोटी रूपये मंजूर -आमदार प्रशांत परिचारक

ना.पंकजाताई मुंडे यांचेकडे आ.प्रशांत परिचारक यांनी मागणी करून पाठपुरावा केला होता


पंढरपूर :- संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी मार्गातील पर्यायी रस्त्यांच्या
रुंदीकरण व नुतनीकरणासाठी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून रू.51 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती आमदार प्रशांत परिचारक यांनी दिली. पंढरपूर येथील आषाढी वारीच्या वेळी पंढरपूर ते पिराची कुरोली तालुका हद्द (जुना अकलूज रस्ता) या रस्त्यावरून संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीतील वाहनांसाठी पर्यायी मार्ग म्हणून भाविक या रस्त्याचा वापर करतात. तसेच आषाढी वारीच्या काळा व्यतिरिे इतरवेळीही या रस्त्याचा वापर स्थानिक शेतकर्‍यांचे शेतीमालाची वाहतूक, ऊस
वाहतूक, शाळा महाविद्यालये आदी बाबींसाठी केला जातो. या रस्त्याचे रुंदीकरण व नुतनीकरण करावे अशी भाविकांची गेल्या अनेक दिवसांपासूनची मागणी पूर्ण करण्यासाठी राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री ना.पंकजाताई मुंडे यांचेकडे आ.प्रशांत परिचारक यांनी मागणी करून पाठपुरावा केला होता.


या रस्त्यांमुळे भाविक व वारक-यांची होणारी सोय लक्षात घेवून ना.पंकजाताई मुंडे यांनी आ.परिचारक यांचे मागणीप्रमाणे पंढरपूर तालुक्यातील पंढरपूर ते पिराची कुरोली पालखी मार्ग भाग एक या 21 किमी लांबीच्या रस्त्यासाठी रू.34 कोटी 51 लाख आणि याच रस्त्याच्या माळशिरस तालुक्यातील भाग दोन या 8.30 किमी लांबीच्या रस्त्यासाठी रू.14 कोटी 24 लाख असा एकुण अंदाजे रू.51 कोटी रूपयांचा निधी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून विशेष बाब म्हणून मंजूर केला. हे दोन्ही पालखी मार्गाच्या रुंदीकरणाचे काम लवकरच हाती घेतले जाणार आहे. पंढरपूर तालुक्याचे तत्कालिन आ.सुधाकरपंत परिचारक यांचे कार्यकालात सन 2008- 09 मध्ये पंढरपूर विकास आराखड्याअंतर्गत वरील रस्ता 7.50 मीटर रूंदीचा करण्याचा प्रस्ताव सादर झालेला होता. त्यानंतर सन 2009 नंतर सत्तांतर झाले व काँग्रेस-राष्ट ्रवादी चे सरकार स्थापन झाले. त्यावेळच्या लोकप्रतिनिधींनी काँग्रेस-राष्ट ्रवादी आघाडी सरकारच्या काळात


तत्कालिन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते या रस्त्याचे भूमिपूजन करून कामकाजासाठी निधी उपलब्ध करून देण्याचे आश्‍वासित केले होते. परंतु सन 2009 ते 2014 या कालावधीत वारकरी भाविकांच्या या जिव्हाळयाच्या प्रश्‍नासाठी आघाडी शासनाने कोणताही निधी उपलब्ध झाला नाही. स्थानिक पातळीवरून लोकप्रतिनिधींनीही यासाठी प्रयत्न केलेनाहीत. दोन वर्षापूर्वी संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील विश्‍वस्तांनी याचा निषेध नोंदवून पालखी पंढरपूर मु क्कामी येत असताना ठिय्या आंदोलन केले होते. त्यावेळी आ.प्रशांत परिचारक यांनी मुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस यांना वैयेीक लक्ष घालून रस्ता रूंदीकरणकरण्याची मागणी केली होती.



परंतु सदरहु रस्ता हा ग्रामीण मार्ग असल्यामुळे त्यांना बजेट मधून निधी देता येत नसल्याने सदरहु मार्ग हा मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेमधून घ्यावा व 3.50 मीटर रूंदीचा नियम असताना वरील रस्ता 7.50 मीटर रूंदी करण्याची मागणी आमदार प्रशांत परिचारक यांनी मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांचेकडे केली व या मागणीचा विचार करून मुख्यमंत्री यांनी खासबाब म्हणून वरील रस्ता 7.50 मीटर रूंदी करण्याचे आदेश ग्रामीण विकास मंत्रालयाला दिले होते. त्यानुसार आमदार प्रशांत परिचारक यांनी ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे यांचेकडे पाठपुरावा केला होता. ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे यांचे वरील मागणीचा विचार करून वारकरी, दिंडीतील भाविकांना, शेतकर्‍यांना होणार्‍या अडचणी लक्षात घेता सदर रस्त्यास निधी
उपलब्ध करून सदरचा रस्ता 7.50 मीटर रूंद करण्याचे आदेश दिले. 

या रस्त्यास निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे व सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांचे आमदार प्रशांत परिचारक यांनी आभार व्यक्त केले.  तसेच या भागात ऊसाचे पिक मोठ्या प्रमाणात असून शेतकर्‍यांचा ऊस या रस्त्यावरून साखर कारखान्यास गेल्यास कारखान्यांचा वाहतुकीचा खर्च खुप मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. तसेच हा रस्ता झाल्यास पंढरपूर-पुणे या रस्त्यावरील वाहतुकीचा भार कमी होण्यास मदत होणार असून या रस्त्यावर अपघाताचे प्रमाणही कमी होणार आहे. वरील रस्त्यास निधी उपलब्ध करून दिल्यामुळे दिंडी प्रमुख, भाविक, शेतकरी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे व सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख व आमदार प्रशांत परिचारक यांचे आभार व्यक्त केले.












-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 43 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com 

No comments:

Post a Comment

Pages