आधुनिक काळात विवाह ठरविताना पत्रिका न पहाता मेडिकल रिपोर्ट व इतर माहिती घ्यावी--उपमहापौर डॉ.सिद्धार्थ धेंडे - Pandharpur Live

Breaking

Post Top Ad

Monday, 15 July 2019

आधुनिक काळात विवाह ठरविताना पत्रिका न पहाता मेडिकल रिपोर्ट व इतर माहिती घ्यावी--उपमहापौर डॉ.सिद्धार्थ धेंडेपुणे- राष्ट्रीय ओबीसी महासंघ, डॉ प्रल्हाद वडगांवकर समाज सेवा ट्रस्ट, फुले शाहु आंबेडकर एज्युकेशनल अँड सोशल फौंडेशन व सप्तपदी वधु वर केंद्रातर्फे राष्ट्रीय सामाजिक एकात्मता अभियानातर्गत   सर्व धर्मीय,सर्वजातीय  मधील विधवा,विधुर घटस्फोटित , विकलांगाचा   मोफत वधु वर परिचय मेळावा 7जुलै 2019 रोजी दु.3 वाजता उद्यान प्रसाद सभागृहात सम्पन्न झाला. 


 त्या प्रसंगी उद्घाटक म्हणून भाषण करताना पुण्यनगरीचे उपमहापौर डॉ.सिद्धार्थ धेंडें म्हणाले की विवाह ठरविताना आजच्या आधुनिक काळात पत्रिका पाहून काही उपयोग नाही जे घडायचे ते घडतेच त्या ऐवजी दोन्ही कडून मेडिकल चेकअप ची मागणी करा.कोणतेही व्यंग ,आजार, व्यसन नाही याची व इतर खात्री करणे हे कधीही चांगले.18 व्या शतकात महात्मा फुले यांनी सत्यशोधक विवाह लावून सत्यता  पाहून कार्य करा यांची शिकवण दिली आणि अनेक विवाह अंतर जातीय देखील लावले आहेत.आज आपल्या संस्थेने पुर्वीच्या पुरोगामी  पुणे शहरात मध्यवर्ती ठिकणी पुन्हा एकदा सर्व जाती धर्माचे मेळावे भरवून सत्यशोधक पद्धतीने विवाह लावीत आहात त्यामुळे नाहक रुढी परंपरा आणि आर्थिक खर्चाच्या बचतीचा संदेश देत आहात,राष्ट्रीय ओबीसी महासंघ व डॉ वडगावकर समाज सेवा ट्रस्ट चे नेहमी उपक्रम चांगले असते तसेच  या कार्यात रघुनाथ ढोक यांचे देखील मोठे कार्य आहे असे गौरवादगार काढले. 

यावेळी  राष्ट्रीय ओबीसी महासंघ व डॉ.वडगांवकर समाज सेवा ट्रस्ट अध्यक्ष डॉ प्रल्हाद वडगांवकर,सप्तपदी केंद्राचे अध्यक्ष सुदाम धाडगे ,सरचिटणीस व फुले शाहु आंबेडकर एज्युकेशनल अँड सोशल फौंडेशन तसेच महात्मा जोतीराव फुले साहित्य, साधने, प्रकाशन समिती, महाराष्ट्र शासनाचे सदस्य रघुनाथ ढोक उपस्थित होते. यावेळी वधुवर यांना आशीर्वाद  देण्यासाठी ख्रिश्चन धर्म गुरू रेव्हरंड जयंत गायकवाड ,शीख धर्म गुरू गयानजी चिनंदरपाल सिंगजी,हिंदू धर्माचे वेदाचार्य डॉ.अजय भागवत गुरुजी उपस्थित राहिले आणि त्यांनी आपल्या धर्माची माहिती देऊन मानवता धर्म सर्वांनी पाळवा तसेच आज कोणत्या गोष्टी ची गरज आहे हे ओळखुन त्या पद्धतीने विवाह करून जाती भेद नष्ट करण्यासाठी प्रयत्न करा असे आवाहन केले.
या वेळी सर्व जाती धर्माचे 95 वर आणि 28 वधु पुनर्विवाह मेळाव्यासाठी उपस्थित होते या मध्ये विधुराची संख्या देखील मोठी होती.नाशिक,औरंगाबाद, सोलापूर,मुबंई, सातारा, पुणे परिसरातुन मोठ्या संख्येने सर्व समाज उपस्थित होता. काही प्रथम वर विवाह लवकर जमेना म्हणून विधवा,घटस्फोटित चालेल म्हणून ही सहभागी झाले होते. 

कार्यक्रमाचे सुरवातीला महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे अर्धपुतळ्यास उपमहापौर डॉ धेंडे आणि धर्मगुरू यांचे शुभहस्ते पुष्पहार अर्पण केला तर सर्व मान्यवरांना युगपुरुष बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज,सामाजिक क्रांतीचे जनक महात्मा फुले,भारतीय स्री शिक्षणाच्या आध्यप्रनेत्या सावित्रीबाई फुले, सामाजिक न्यायाचे जनक राजर्षी शाहु महाराज  आणि  भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची एकत्रित असलेली फोटो प्रेम  आणि पुष्पहार घालून सन्मान करण्यात आला तर सर्व वधु वर यांचे गुलाब फुल व सप्तपदी चे मासिक देऊन स्वागत केले.

 कार्यक्रमाचे प्रास्थाविक भाषणात वर्षभर  राष्ट्रीय सामाजिक एकात्मता अभियानात विविध उपक्रम यशस्वी पणे राबविले गेलेची माहिती डॉ.प्रल्हाद वडगांवकर यांनी दिली,तर पाहुण्यांचा परिचय माजी विश्वस्त व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चे प्रो.डॉ.सतीश शिरसाट यांनी करून दिला. स्वागत आणि सूत्रसंचालन रघुनाथ ढोक यांनी केले व आभारप्रदर्शन सुदाम धाडगे यांनी मानले.आणि सहधर्मदाय आयुक्त श्रीमती आर.पी. मुक्कावर (अडगुलवार) , उपधर्मदाय आयुक्त मा.नवनाथजी जगताप साहेब, अधीक्षक अनाप यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.तर  उद्यान प्रसाद कार्यालयाचे मालक  शेखर बामणे, किशोर भास्कर,  आकाश ढोक ,श्रीमती उज्वला कांडपीळे, सौ सुधा धाडगे सौ आशा ढोक  यांनी मोलाचे सहकार्य केले.-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 43 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com 

No comments:

Post a Comment

Pages