प्रथम वर्ष पदवी अभियांत्रिकीच्या प्रवेशाचा सेकंड कॅप राऊंड आजपासून.. दोनच दिवस चालणार प्रक्रिया - Pandharpur Live

Breaking

Post Top Ad

Tuesday, 16 July 2019

प्रथम वर्ष पदवी अभियांत्रिकीच्या प्रवेशाचा सेकंड कॅप राऊंड आजपासून.. दोनच दिवस चालणार प्रक्रिया


पंढरपूरः-गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयात अभियांत्रिकी (पदवी) ऑनलाईन प्रवेश प्रकियाची दुसरी फेरी (सेकंड कॅप राऊंड) आजपासून (बुधवार, दि. १७ जुलै २०१९) सुरु होणार असून ती गुरुवार,१८ जुलै सायंकाळी ५ वाजेपर्यंत म्हणजे अवघे दोनच दिवस चालणार आहे. स्वेरीच्या फॅसिलिटेशन सेंटर (एफ.सी.क्रमांक ६२२०) मध्ये ऑनलाईन सेकंड कॅप राउंड ऑप्शन फॉर्म भरण्याची सोय केली असून याची अलॉटमेंट यादी महाराष्ट्र शासनाच्या राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या संकेतस्थळावर शनिवार, २० जुलै रोजी प्रसिद्ध होणार आहे.’ अशी माहीती श्री विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूट, पंढरपूरचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे यांनी दिली. 


        सन २०१९-२० च्या पदवी अभियांत्रिकीच्या आज बुधवार (दि.१७ जुलै) रोजी प्रवेशाच्या दुसऱ्या फेरी (कॅप राउंड-२) ला सुरवात होत असून उद्या गुरुवार (दि. १८ जुलै) यामध्ये आपल्याला योग्य महाविद्यालय व योग्य अभ्यासक्रम (विभाग) याची निवड करावी लागणार आहे. यासाठी विचारपूर्वक कॅप राऊंड-२ चे ऑप्शन फॉर्म भरावेत. दुसऱ्या फेरीसाठी महाविद्यालय निवडताना, प्रवेश घेणाऱ्या महाविद्यालयातील प्रवेशाची संख्या, विद्यार्थ्यांच्या परीक्षेचे निकाल, कॅम्पस प्लेसमेंटची संख्या, सोयी-सुविधा, उच्च शिक्षित प्राध्यापकवर्ग याचा प्रामुख्याने विचार करावा लागणार आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यास करून करिअरच्या दृष्टीने सर्व बाजूंनी विचार करून योग्य महाविद्यालयाची निवड करावी. 


चार वर्षे मौज मजा करण्यापेक्षा चार वर्षे परिश्रम करून घेणाऱ्या महाविद्यालयाची निवड करावी, जेणेकरून भविष्यकाळ सुखाचा व समृद्धीचा जाईल.  ज्या विद्यार्थ्यांना आपल्या पसंतीचे महाविद्यालय व विभाग मिळाले नाही तसेच अद्याप कोणत्याही स्वरूपात प्रवेश मिळालेला नाही अशा विद्यार्थ्यांनी या सेकंड कॅप राउंडचा लाभ घेता येणार आहे. पदवी अभियांत्रिकीच्या प्रवेशासंदर्भात अधिक माहितीसाठीप्रथम वर्ष प्रवेसचे अधिष्ठाता डॉ. पी. एस. कचरे (९५४५५५३७७४)स्वेरीचे कॅम्पस इन्चार्ज प्रा. एम. एम. पवार (९५४५५५३८८८), प्रथम वर्ष अभियांत्रिकीचे विभागप्रमुख डॉ. सतीश लेंडवे (९५४५५५३८७८) प्रा. यु. एल. अनुसे (९१६८६५५३६५) व प्रा. पी. के. भुसे (९२८४०७७०८०) या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. पदवी अभियांत्रिकीच्या ऑलाईन प्रवेशासाठी मिळालेल्या प्रतिसादाच्या पार्श्वभूमीवर व कॅम्पस प्लेसमेंटच्या विक्रमी निवडीवर स्वेरीमध्ये प्रचंड गर्दी होत आहे.













-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 43 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com 

No comments:

Post a Comment

Pages