गोपाळकाल्याने आषाढी वारीची सांगता... चंद्रग्रहणामुळे माऊलींचा पंढरीतील मुक्काम वाढला - Pandharpur Live

Breaking

Post Top Ad

Tuesday, 16 July 2019

गोपाळकाल्याने आषाढी वारीची सांगता... चंद्रग्रहणामुळे माऊलींचा पंढरीतील मुक्काम वाढला
   वैकुंठीतो ऐसे नाही। कवळ काही काल्याचे। एकमेकां देऊं मुखी, सुखी घालू हुंबरी।्। या संत वचनाप्रमाणे गोपाळ काल्याचा उत्सव आज झाला. गोपाळकाला गोड झाला, गोपाळाने गोड केलाच्या जयघोषात अवघी गोपाळपूर नगरी लाखो वारकर्‍यांच्या गजराने दुमदुमून गेली. आषाढी यात्रा सोहळ्याची काल्याने सांगता झाली.  आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी गोपाळपूर येथे गोपाळकाला संपन्न झाला व गोपाळकाल्याने आषाढी वारीची सांगताही झाली. आषाढी वारीनिमित्त भुवैकुंठ पंढरी नगरीत आलेल्या साधुसंतांची वारी आज परिपुर्ण झाली. गोपाळकाल्यानंतर साधु-संतांच्या पालख्या परतीच्या वाटेला लागत असतात. त्यानुसार कांही पालख्यांसह आज संत श्रीतुकाराम महाराजांच्या पालखीचे श्रीक्षेत्र देहुकडे प्रस्थान झाले. परंतु आज खंडग्रास  चंद्रग्रहण असल्यामुळे माऊलींच्या पालखीचे प्रस्थान मात्र झाले नाही. त्यामुळे माऊलींच्या पालखीचा आजचा मुक्काम भुवैकुंठ पंढरी नगरीमध्येच आहे.


गोपाळपूर ग्रामपंचायतीने सर्व पालख्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत केले. पौर्णिमेच्या दिवशी परंपरेनुसार गोपाळपूर  येथे मानाची अंमळनेरकर महाराजांची पालखी काल्याच्या उत्सवासाठी भगवान श्रीकृष्ण मंदिरात दाखल झाली. त्यानंतर कीर्तन झाले. पुढे पुढे चाला मुखाने  गजानन बोला चा जयघोष करीत भागवत धर्माची पताका खांद्यावर घेऊन  संत गजानन महाराजांच्या पालखीचे पहाटे सहाच्या दरम्यान शिस्तीने आगमन झाले. पहाटे पासूनच एकामागोमाग एक अशा विविध संतांच्या छोट्या मोठ्या दिंड्या पालख्या विठ्ठलनामाचा गजर करीत गोपाळपुरात दाखल होत होत्या.   

सकाळी साडेनऊच्या सुमारात  संत तुकाराम महाराजांची तर पावणे दहाच्या सुमारास  संत ज्ञानेश्वर महाराजांचे पालखी सोहळे गोपाळपुरात दाखल झाले. या पालख्या दाखल होताच ग्रामपंचायतीच्या पदाधिकार्‍यांनी तसेच शासकीय कर्मचारी आणि अधिकार्‍यांनी पालख्यांचे स्वागत केले.  ज्ञानेश्वर महाराजांच्या तसेच  तुकाराम महाराजांच्या पादुकांचे पूजन करण्यात आले. मंदिराच्या जवळ पालख्या विसावल्या होत्या.   भाविक मोठ्या श्रध्देने  गोपाळकृष्णाचे दर्शन घेऊन मंदिराला प्रदक्षिणा घातली. कीर्तन करून वारकरी एकमेकांना प्रेमाने लाह्यांचा काला भरवून गळाभेट घेत होते. श्रीकृष्ण मंदिर समितीच्या वतीने प्रसाद म्हणून लाह्यांच्या काल्याचे वाटप केले जात होते.-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 43 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com 

No comments:

Post a Comment

Pages