पुळुज येथील लिंबू बागायतदार शेतक-यांना उच्च न्यायालयाचा दिलासा. - Pandharpur Live

Breaking

Post Top Ad

Thursday, 25 July 2019

पुळुज येथील लिंबू बागायतदार शेतक-यांना उच्च न्यायालयाचा दिलासा.


 पंढरपूर प्रतिनिधी:- पंढरपूर तालुक्यातील पुळुज येथे 2004 साली भीषण स्वरूपात जी गारपीट झाली होती. गारपिटीचा येथील लिंबू बागायतदारांना नुकसान भरपाई मिळावी म्हणून त्यावेळचे तत्कालीन तहसीलदार बाबुराव पवार यांनी पंचनामे करून त्या पंचनाम्यात नावे सुध्दा आले होती परंतु नुकसान भरपाई  रक्कम मिळाली नसल्यामुळे   पुळुज येथील लिंबू बागायतदार संघाचे उपाध्यक्ष  विनोद भैया महाडिक यांनी एक पत्र दिले होते व शासन स्तरावर आम्हाला याची नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली होती. पण पंढरपूरचे तहसीलदार पवार यांनी यामध्ये कोणतीही लक्ष न घालता त्यांच्या मागणीकडे कानाडोळा केला होता. त्यानंतरसुद्धा विनोद भैया महाडिक यांनी तहसील कार्यालयाला दोन ते तीन वेळा स्मरण पत्र लिहून यांचा पाठपुरावा करण्याचा प्रयत्न केला होता परंतु  त्याचा काही उपयोग झाला नाही त्यानंतर पुळुज येथील ग्रामस्थांनी व विनोद (भैय्या) महाडिक यांनी 14 महिन्यापूर्वी मुंबई येथील उच्च न्यायालयात एक पिटीशन दाखल करून या सर्वांना आव्हान होते. 



14 ते 15 महिन्याच्या न्यायालयीन लढाईनंतर गेल्या महिन्यात 19 जून रोजी याचा निकाल लागला. पुळुज येथील सर्व लिंबू बागायतदारांना यामुळे दिलासा मिळाला उच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे सर्व लिंबू उत्पादक शेतकऱ्यांना अखेर न्याय मिळाला असून दिनांक 19 जून रोजी या निकालानंतर लगेचच एक महिन्यानंतर पुळुज येथील 18 शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाई  3लाख रू चा धनादेशाचा वाटप करण्यात आले.या सर्व खटल्याचे उच्च न्यायालयातील न्यायालयीन कामकाज अॅड.अशोक तांजणे यांनी पाहिले तर स्थानिक पातळीवरील काम अॅड. कुमार बाबर यांनी पाहिले.  या सर्व प्रकरणाची जबाबदारी व कामकाजामध्ये लिंबू बागायतदार संघाचे उपाध्यक्ष विनोद(भैय्या)महाडिक यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.






-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 45 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com 

No comments:

Post a Comment

Pages