पंढरपुरात स्वच्छता अभियानात पंधरा टन कचरा गोळा सुमारे तीन हजार अधिकारी कर्मचारी, विद्यार्थी व स्वयंसेवी संस्था यांचा सहभाग - Pandharpur Live

Breaking

Post Top Ad

Saturday, 20 July 2019

पंढरपुरात स्वच्छता अभियानात पंधरा टन कचरा गोळा सुमारे तीन हजार अधिकारी कर्मचारी, विद्यार्थी व स्वयंसेवी संस्था यांचा सहभाग



         पंढरपूर दि. 20 :- सोलापूर जिल्हा प्रशासनाने आज राबविलेल्या महास्वच्छता अभियानात 15 टन कचरा गोळा करण्यात आला. आषाढी वारीनंतर पंढरपुरात  अतिरिक्त जिल्हाधिकारी  रामचंद्र शिंदे  यांच्या नेतृत्वाखाली राबविलेल्या या अभियानात सुमारे तीन हजार अधिकारी व  कर्मचारी ,  कॉलजचे विद्यार्थी  व स्वयंसेवी सहभागी झाले होते. 

पंढरपुरातील, मंदीर परिसर, प्रदक्षिणा मार्ग, स्टेशन रोड, पत्राशेड दर्शन बारी, भक्ती मार्ग, वाखरी, 65 एकर आणि नदीपात्रातील वाळवंट येथे स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. प्रत्येक ठिकाणासाठी स्वतंत्र पथके करण्यात आली होती. एक जेसीबी, दोन टिपर, तीन ट्रॅक्टर , एक ट्रक, यांच्या साहाय्याने हा कचरा शहराबाहेर हलविण्यात आला.
महास्वच्छता अभियानाचा शुभारंभ अतिरिक्त जिल्हाधिकारी  रामचंद्र शिंदे  यांच्या हस्ते नामदेव पायरी येथे करण्यात आला. उप विभागीय अधिकारी सचिन ढोले, तहलिसदार मधुसूदन बर्गे, तहसिलदार जीवन बनसोडे, संजय पाटील, स्वप्निल रावडे, ऋषीकेश शेळके, गटविकास अधिकारी रवीकिरण घोडके, मुख्याधिकारी अभिजीत बापट, वीणा पाटील यांच्यासह अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.



आषाढी वारीसाठी पंढरपूर येथे  10 ते 12 लाख वारकरी येतात. आषाढी यात्रा संपन्न झाल्यानंतर  पंढरपूरात स्वच्छता राहावी यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत महास्वच्छता अभियान राबविण्यात आले.असल्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांनी सांगितले. मंदीर परिसर , शहरातील व परिसरात स्वच्ठता रहावी. शहरातील नागरीकांना व भाविकांना कोणत्याही प्रकारचा कचरा किंवा आजाराचा प्रादुर्भाव होणार नाही याची दक्षता घेतली जाणार असून,  कोणत्याही आरोग्याच्या समस्येस  सामोरे जावे  लागू नये यासाठी महास्वच्छता अभियान राबविण्यात येत असल्याचेही ते म्हणाले.
महास्वच्छता अभियानात  पंढरपूरच्या स्वच्छतेसाठी पंढरपुरात आलेल्या शासकीय अधिकारी-कर्मचारी, कर्मचारी, स्वयंसेवी संस्था यांनी काम केले. हातात झाडू घेऊन अतिरिक्त जिल्हाधिकारी रामचंद्र यांनी नामदेव पायरी येथून स्वच्छतेला प्रारंभ केला. त्यांनी प्रदक्षिणा मार्ग, दर्शरांग, व नदीपात्रात स्वच्छता केली. यासाठी बार्शी, पंढरपूर, मोहोळ, मंगळवेढा व सांगोला तालुक्यातील  सर्व विभागांचे प्रमुख व संबधित  अधिकारी यांना  आवश्यक  सूचना दिल्या.













-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 43 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com 

No comments:

Post a Comment

Pages