कोळी महादेव जमातीच्या सर्वांना जातीचे दाखले निश्‍चित देवू- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस - Pandharpur Live

Breaking

Post Top Ad

Thursday, 18 July 2019

कोळी महादेव जमातीच्या सर्वांना जातीचे दाखले निश्‍चित देवू- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


पंढरपूर (प्रतिनिधी):- ‘‘कोळी महादेव जमातीच्या सर्वांना जातीचे दाखले निश्‍चित देवू.’’ असे आश्‍वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले असल्याची माहिती महर्षी वाल्मिक संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे. आषाढी एकादशीला श्रीविठ्ठल-रुक्मिणीच्या शासकीय महापुजेसाठी मुख्यमंत्री पंढरीत आले असताना अंकुशराव यांनी त्यांची भेट घेऊन कोळी महादेव जमातीच्या व्यथा त्यांच्यासमोर मांडल्या होत्या.


महर्षी वाल्मिकी संघाने अनेक वर्ष सातत्याने विविध प्रकारची आंदोलनं करुन, मुख्यमंत्र्यांना वारंवार निवेदने देऊन कोळी जमात बांधवांना न्याय मिळवून दिला आहे. आषाढी एकादशीच्या आत जातीच्या दाखल्यांचा प्रश्‍न सोडवा अन्यथा आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल. असा इशारा दिल्यानंतर प्रशासनाकडून 34 जणांना जातीचे दाखले देण्यात आले. त्यामुळे महाराष्ट्र शासनाचे आभार व्यक्त करुन बाकी समाजबांधवांनाही जातीचे दाखले मिळावेत व जमात बांधवांचे इतर प्रलंबीत प्रश्‍न सोडवावेत अशी विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सविस्तर चर्चा करुन कोळी महादेव जमातीचे सवर्र् प्रश्‍न मार्गी लावण्यात येतील व सर्वांना जातीचे दाखले मिळतील. असे आश्‍वासन देऊन आमच्या जमात बांधवांना खुप मोठा दिलासा दिला असल्याची माहिती गणेश अंकुशराव यांनी दिली आहे.

 


जातीच्या दाखल्यांच्या प्रश्‍नासोबतच आदिवासी कोळी महादेव जमातीच्या विद्यार्थ्यांना मिळणारी शैक्षणीक शिष्यवृत्ती सुरु करणे, आद्यक्रांतीकारक राघोजी भांगरे यांचे स्मारक उभारणे व चंद्रभागेवरील नियोजीत पुंडलिक सेतु उभारणेचा निर्णय रद्द करणे आदी मागण्यांचा पाठपुरावा शासनाकडे सुरु असुन लवकरच हे प्रश्‍न सुटण्यासाठीची आशा मुख्यमंत्र्यांच्या आश्‍वासनामुळे पल्लवीत झाली असल्याचे मत गणेश अंकुशराव यांनी व्यक्त केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटुन कोळी महादेव जमातीच्या प्रलंबीत मागण्यांबाबत निवेदन देताना दुग्धविकास राज्यमंत्री महादेव जानकर, महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव यांच्यासह अभय अंकुशराव, गणेश कांबळे, वैभव कांबळे आदी उपस्थित होते.













-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 43 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com 

No comments:

Post a Comment

Pages