आषाढी वारीनंतर झालेल्या प्रक्षाळ पुजेमुळे श्रीविठ्ठल रुक्मिणी मातेचा शिणवटा झाला दूर - Pandharpur Live

Breaking

Post Top Ad

Monday, 22 July 2019

आषाढी वारीनंतर झालेल्या प्रक्षाळ पुजेमुळे श्रीविठ्ठल रुक्मिणी मातेचा शिणवटा झाला दूरनुकताच आषाढी वारीचा सोहळा संपन्न झाला. आषाढी वारीमध्ये अखंडीतपणे भाविक-भक्तांना 24 तास दर्शन देणार्‍या देवाचा शिणवटा दुर करण्यासाठी श्रीविठ्ठल-रुक्मिणी मातेची प्रक्षाळपुजा काल करण्यात आली. केशरयुक्त पाण्याने देवाला स्नान घालण्यात आले. त्यानंतर खास पुरणपोळीचा नैवद्ये दाखविण्यात आला. रात्री खास 14 पदार्थ घालुन काढा करुन दाखविण्यात आला. श्रीविठ्ठल-रुक्मिणी मातेचा शिणवटा घालविण्यासाठी गवती चहाची पाने, गुळ, जायफळ, लेंडीपिंपळी, जेष्ठमध, काळे जिरे, काजू, बदाम, खारीक, सुंठ, बेदाणा, लवंग, वेलदोडे, चारोळे आदी पदार्थांपासून बनविलेला खास काढा रात्रीच्या वेळी श्रीविठ्ठल-रुक्मिणी मातेला परंपरेनुसार दाखविण्यात आला.


 दि. 21 जुलै रोजी संपुर्ण मंदिराची स्वच्छता करण्यात आली. त्यानंतर श्रीविठ्ठल-रुक्मिणी मातेला केशरयुक्त गरम पाण्याने स्नान घालण्यात आले. मंदिर समितीचे सदस्य संभाजी शिंदे यांनी सपत्नीक प्रक्षाळ पुजा केली. प्रक्षाळपुजेनंतर श्रीविठ्ठल-रुक्मिणीमातेस पारंपारिक दागिने व आकर्षक पोशाख परिधान करण्यात आला. कालपासुन श्रीविठ्ठलावरील नित्योपचार सुरु करण्यात आल्याची माहिती मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी दिली. 
-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 43 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com 

No comments:

Post a Comment

Pages