छत्रपती उदयनराजे भोसले समर्थक इर्शाद मुजावर यांचेकडून वारकरी भावीकांना फराळ वाटप - Pandharpur Live

Breaking

Post Top Ad

Wednesday, 17 July 2019

छत्रपती उदयनराजे भोसले समर्थक इर्शाद मुजावर यांचेकडून वारकरी भावीकांना फराळ वाटप


श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांचे कट्टर समर्थक इर्शाद साहेबलाल मुजावर यांच्या वतीने आषाढी एकादशी निमित्त वारकर्‍यांना मोफत फराळ व चहा वाटप करण्यात आले.

संकल्प 2019 या संकल्पनेखाली श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले ह्यांचे कट्टर समर्थक इर्शाद साहेबलाल मुजावर यांच्या वतीने सालाबाद प्रमाणे आषाढी एकादशी निमित्त वारकर्‍यांना मोफत फराळ व चहा वाटप करण्यात आल. तसेच श्री क्षेत्र दत्त मंदीर, पांडवनगर, जगदंबा मंदीर उरूल, श्री हनुमान मंदीर, शेडगेवाडी, ता.पाटण,जि.सातारा येथील  विश्वमाऊली संत ज्ञानेशवर महाराज पालखी पायी दिंडी सोहळ्यास मोफत निवार्‍याची सोय केली.


या उपक्रमाबाबत सुनील (तात्या) काटकर (माजी सभापती अर्थ व बांधकाम विभाग, सातारा जि.प.सातारा) व सुनील राजेभोसले (श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांचे सुपा परागणा प्रमुख) यांनी इर्शाद मुजावर यांचे अभिनंदन केले व या कार्याचे कौतुक करुन शुभेच्छा दिल्या.

या अनोख्या संकल्पनेसाठी माजी सैनिक वडील नाईक साहेबलाल लाला मुजावर(व्हाइस चेअरमन कर्नल आर डी निकम सैनिक सहकारी बँक लि.सातारा)मातोश्री सौ.नर्गिस साहेबलाल मुजावर (मा.अधिपरिचारिका),
पत्नी सौ.हिना इर्शाद मुजावर,मुलगा चि.आयान इर्शाद मुजावर व मित्र परिवाराची साथ लाभल्याचे संयोजक इर्शाद साहेबलाल मुजावर यांच्या वतीने सांगण्यात आले. 

उभ्या हिंदूस्थानचे आरध्य दैवत श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आर्शिवादाने, दैवत श्रीमंत छत्रपती खासदार उदयन महाराज यांच्या प्रेरणेने माझ्या विठ्ठू माऊलीच्या कृपेने अशा प्रकारे भाविक भक्तांना दरवर्षी आषाढी एकादशीला मोफत फराळ व चहा वाटपाचा संकल्प करणार असल्याचे छत्रपती उदयनराजे समर्थक इर्शाद साहेबलाल मुजावर यांनी सांगितले.
















-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 43 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com 

No comments:

Post a Comment

Pages