स्वेरीमध्ये बी. व्होक. पदवी कोर्सेस सुरु - Pandharpur Live

Breaking

Post Top Ad

Saturday, 20 July 2019

स्वेरीमध्ये बी. व्होक. पदवी कोर्सेस सुरु



पंढरपूर-आखिल भारतीय तांत्रिक शिक्षण परिषद, नवी दिल्ली व पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर  विद्यापीठ, सोलापूर मान्यताप्राप्त कौशल्यावर आधारित गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयात यंदाच्या वर्षीपासून बी. व्होक. पदवी कोर्सेस सुरु झाले आहे.’ अशी माहिती स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे  प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे यांनी दिली.

बी. व्होक. कोर्ससाठी कोणत्याही शाखेतील बारावी उत्तीर्ण असणारे विद्यार्थी पात्र असून अॅटोमोबाईल सर्व्हिसिंग, रेफ्रिजरेशन अॅण्ड एअर कंडिशनींग आणि सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट हे तीन अभ्यासक्रम सुरु असून यासाठी प्रत्येकी २५ विद्यार्थ्यांची प्रवेश क्षमता आहे. प्रत्येक कोर्ससाठी रु. पंधरा हजार शुल्क असून तीन वर्षाचा कोर्स आहे. पहिले वर्ष पूर्ण झाल्यावर डिप्लोमा सर्टिफिकेट मिळेल, दुसरे वर्ष पूर्ण झाल्यावर अॅडव्हान्सड डिप्लोमा सर्टिफिकेट तर तिसरे वर्ष पूर्ण केल्यानंतर बी.व्होक. डिग्री सर्टिफिकेट मिळते. बी. व्होकची पदवी ही बी.ए.,बी.काम. अथवा बी.एस्सी. पदवीच्या समकक्ष आहे. यासाठी वयाची अट नाही. या अभ्यासक्रमानंतर यू.पी.एस.सी. व एम.पी.एस.सी. अशा स्पर्धा परीक्षा देता येतात.

क्रेडीटवर आधारित सत्र परीक्षा आहे. यासाठी सुसज्ज प्रयोगशाळा व औध्योगिक क्षेत्रातील अनुभवी प्राध्यापक ज्ञानदान करत आहेत. या दरम्यान अभ्यासासाठी सहली, वर्कशॉप व्हिजीट याद्वारे इंडस्ट्रीबरोबर सुसंवाद घडवून आणले जातील. यासाठी माफक फी असून भरपूर प्रात्याक्षिके आहेत. स्वेरी अंतर्गत असलेल्या अभियांत्रिकी व फार्मसीच्या पदवी, पदविका आणि पदव्युत्तर पदवीला मिळालेले प्रचंड यश आणि या कोर्ससाठी असलेली मर्यादित प्रवेश संख्या यामुळे या अभ्यासक्रमांना देखील महत्व प्राप्त झाले आहे. या अभ्यासक्रमाच्या अधिक माहितीसाठी प्रा. सुभाष जाधव (मोबा. नं.९७६७५७१८५५), प्रा. रुपाली शिंदे (मोबा. नं.८६००१२६२५३), डॉ. प्रवीण कचरे (मोबा. नं.९५४५५५३७७४) व प्रा. मुकुंद पवार (मोबा. नं.९५४५५५३८८८) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.













-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 43 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com 

No comments:

Post a Comment

Pages